गुरूवार, एप्रिल 16, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

रॉयल एंट्री, जबरदस्त डान्स अन्…; पुलकित सम्राट व क्रिती खरबंदाच्या लग्नाचा थाटच न्यारा, नाचत मंडपात आला आणि…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मार्च 15, 2024 | 6:39 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Pulkit Samrat And Kriti Kharbanda Wedding

रॉयल एंट्री, जबरदस्त डान्स अन्…; पुलकित सम्राट व क्रिती खरबंदाच्या लग्नाचा थाटच न्यारा, नाचत मंडपात आला आणि…

सध्या सिनेसृष्टीत लग्नाचे वारे वाहू लागले आहेत. एकामागोमाग एक कलाकार मंडळी लग्नबंधनात अडकत असल्याचं पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी अनंत अंबानी व राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग सोहळ्याची चांगलीच चर्चा रंगली. यानंतर सगळ्यांच्या नजरा बॉलिवूडमधील एका लोकप्रिय कपलकडे वळल्या आहेत. ही जोडी म्हणजे अभिनेता पुलकित सम्राट आणि अभिनेत्री क्रिती खरबंदा. पुलकित व क्रिती हे दोघेही आज दिल्लीत विवाहबंधनात अडकणार आहेत. (Pulkit Samrat And Kriti Kharbanda Wedding)

अशातच लग्नासाठी तयार झालेल्या नववराची शेरवानीमधील झलक समोर आली आहे, ज्यामध्ये तो आपल्या नवरी मुलीला आणण्यासाठी पूर्णपणे तयार झालेला दिसत आहे. लग्नासाठी तयार झालेल्या पुलकितचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहायला मिळत आहेत. या फोटोंमध्ये तो लग्नासाठी आलेल्या पाहुणे मंडळींसह विंटेज कारमध्ये उभा असल्याचे दिसत आहे.

आणखी वाचा – हिना खानला ‘हा’ गंभीर आजार, रमजानमध्ये रोजा ठेवताही येईना, स्वतःच केला खुलासा, म्हणाली, “माझ्या आईने मला…”

View this post on Instagram

A post shared by Delhi Times (@delhi.times)

पुलकित व क्रितीचे लग्न दिल्ली एनसीआरच्या मानेसर येथील ITC ग्रँड भारत येथे होत आहे. भारतीय पद्धतीने दोघांचा लग्नसोहळा पार पडणार आहे. याआधी दोघांचा विवाहपूर्व कार्यक्रमही अगदी थाटामाटात पार पडला. १४ मार्च रोजी मेहंदी व संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने त्यांनी नूर झोरा यांच्या गिधा ग्रुपला बोलावून हळदी-संगीतचा दिमाखात कार्यक्रम पार पडला.

आणखी वाचा – Video : ऑस्ट्रेलियावरुन येताच विमानतळावर वनिता खरातच्या स्वागतासाठी नवरा हजर, घरी बायकोसाठी मासेही बनवले अन्…; व्हिडीओ व्हायरल

पुलकित-क्रितीच्या लग्नासाठी जवळचे कुटुंबीय, नातेवाईक व काही कलाकार मंडळीही उपस्थित आहेत. या लग्नाला जवळपास २०० पाहुणे येणार असल्याची माहिती समोर आली आहे. रिपोर्ट्सनुसार, या लग्नाला शाही टच देण्यासाठी सर्व गोष्टींची विशेष काळजी घेण्यात आली आहे. पुलकित व क्रितीच्या या भव्य लग्नाची सर्व व्यवस्था दिल्लीतूनच करण्यात आल्याचे वृत्त आहे. दोघांच्या लग्नात कोलकाता, बनारस, राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र व दिल्लीच्या सर्व खास पदार्थांचा आस्वाद घेता येणार असल्याची चर्चा आहे.

Tags: entertainmentPulkit Samrat And Kriti KharbandaPulkit Samrat And Kriti Kharbanda Weddingpulkit samrat wedding look
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Rakhi Sawant and Raqesh Bapat bonding
Entertainment

“मला माझा संसार हवाय”, राकेश बापटच्या एकतर्फी प्रेमात आहे राखी, म्हणाली, “मी बॉलिवूड सोडेन”

एप्रिल 15, 2026 | 4:38 pm
Rakhi Sawant Interview
Entertainment

वडिलांचा विरोध, छोटे कपडे घालून आयटम साँग आणि…; Dramaqueen राखी सावंतचा स्ट्रगल, म्हणाली, “कोणाचा बाप बसलाय…”

एप्रिल 15, 2026 | 1:26 pm
Bobby Deol alcohol quit
Entertainment

“कुटुंबातील सदस्य घाबरले”, दीड वर्षांपासून दारूपासून दूर राहिलाय बॉलिवूड अभिनेता, लवकर थकायचा आणि…

एप्रिल 15, 2026 | 11:49 am
rakhi sawant desinger dress
Entertainment

‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी १२ लाखाचा ड्रेस, राखी सावंतची जय्यत तयारी, दुबईला जाऊन…

एप्रिल 15, 2026 | 11:08 am
Next Post
Orry selfie charges

बॉलिवूड पार्टी, सेलिब्रिटींबरोबर दिसणारा ऑरी पैसे नक्की कसे कमावतो?, खरंच एका सेल्फीसाठी 'इतके' पैसे घेतो का?, सत्य आलं समोर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.