गुरूवार, एप्रिल 16, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मित्रानेच फसवलं, आयुष्यभराची कमाई गेली अन्…; मालिकांमध्ये काम करणाऱ्या जोडप्याचे रडून हाल, आता परिस्थिती अशी की…

Majja Webdeskby Majja Webdesk
जून 12, 2025 | 1:26 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Puja Banerjee Kunal Verma fraud

मित्रानेच फसवलं, आयुष्यभराची कमाई गेली अन्...; मालिकांमध्ये काम करणाऱ्या जोडप्याचे रडून हाल, आता परिस्थिती अशी की...

आयुष्यभर केलेली मेहनत एका चुकीनंतर धुळीला मिळाली तर होत्याचं नव्हतं होतं. असंच काहीसं सुप्रसिद्ध जोडप्याबरोबर घडलं आहे. पूजा बॅनर्जी व कुणाल वर्मा हे कलाक्षेत्रातील सुप्रसिद्ध जोडपं आहे. दोघांनीही आजवर अनेक सुपरहिट हिंदी मालिकांमध्ये काम करत नाव कमावलं. प्रसिद्धीसह पैसाही कमावला. मात्र एका चुकीच्या निर्णयामुळे पूजा व कुणालला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. एका जवळच्या मित्राच्या सांगण्यानुसार त्यांनी पैशांची गुंतवणूक केली. आयुष्यभराची बचत त्यांनी यासाठी केली होती. पण त्याच मित्राने पूजा व कुणालला फसवलं आहे. याचबाबत दोघांनी उघडपणे सांगितलं. (Puja Banerjee Kunal Verma fraud)

ईटाइम्सला दिलेल्या मुलाखतीत पुजाने म्हटलं की, “गेले दोन ते तीन महिने आमच्यासाठी खूप कठीण आहेत. पुढे काय होईल? याचा अंदाजही आम्हाला नाही. आमच्याबरोबर पैशांची फसवणूक झाली आहे. एक मोठी रक्कम आम्ही गमावली आहे. आता आम्हाला शुन्यापासून सुरुवात करावी लागणारी आहे. अशा परिस्थिती आम्हाला हार मानायची नाही. या फसवणूकीमध्ये आम्ही आमची संपूर्ण बचत गमावली आहे. तुम्ही सगळे आम्हाला पाठींबा द्या आणि आमच्यासाठी प्रार्थना करा. देवावर आम्हाला विश्वास आहे”.

आणखी वाचा – “घटस्फोट घेतला आणि दोन महिन्यात तो गेला”, ‘भाभीजी घर पर है’ फेम अभिनेत्री नवऱ्याच्या आठवणीत भावुक, म्हणाली, “नशेच्या आहारी…”

View this post on Instagram

A post shared by Puja Banerjee (@banerjeepuja)

कुणाल म्हणाला, “तुम्ही सतत तीन वर्ष कोणावर तरी विश्वास ठेवता तेव्हा तो सतत तुमच्याबरोबर असतो. तुमच्या घराचा, कुटुंबाचा तो एक भाग होतो. माझ्या कुटुंबालाही मी याबाबत काहीच सांगितलं नव्हतं. या घटनेमुळे आम्ही खूप रडलो. गेल्या काही महिन्यांपासून आम्ही खूप दुखावलो आहोत. आम्हाला फक्त तुमचा पाठिंबा हवा आहे. या संपूर्ण घटनेबाबत कुटुंबाला कळवणं आमच्यासाठी खूप कठीण होतं”.

आणखी वाचा – कर्करोगाच्या शस्त्रक्रियेनंतर दीपिका कक्करची पहिली पोस्ट, अभिनेत्रीची तब्येत आता नेमकी कशी?, म्हणाली, “अल्लाह…”

पुढे तो म्हणाला, “पण आता कुटुंबियांना सगळं माहित झालं आहे. इतकं नुकसान व फसवणूकबाबत कुटुंबियांना सांगायलाच आम्हाला भीती वाटत होती. आमचं पूर्ण आयुष्य आम्ही खूप मेहनत केली. त्यानंतर पैसे आम्ही कमावले होते”. पूजा व कुणाल आता मोठ्या आर्थिक संकटात अडकले आहेत. कहानी घर घर की, करम अपना अपना, कस्तुरी, ये रिश्ता क्या कहलाता है अशा अनेक हिंदी कार्यक्रमांमध्ये पूजाने काम केलं आहे. २०२१नंतर तिने पहिल्या मुलाला जन्म दिला. आता दोघांनाही हिंमतीने पुन्हा उभं राहायचं आहे.

Tags: bollywood newsentertainment newsHindi serial
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Rakhi Sawant and Raqesh Bapat bonding
Entertainment

“मला माझा संसार हवाय”, राकेश बापटच्या एकतर्फी प्रेमात आहे राखी, म्हणाली, “मी बॉलिवूड सोडेन”

एप्रिल 15, 2026 | 4:38 pm
Rakhi Sawant Interview
Entertainment

वडिलांचा विरोध, छोटे कपडे घालून आयटम साँग आणि…; Dramaqueen राखी सावंतचा स्ट्रगल, म्हणाली, “कोणाचा बाप बसलाय…”

एप्रिल 15, 2026 | 1:26 pm
Bobby Deol alcohol quit
Entertainment

“कुटुंबातील सदस्य घाबरले”, दीड वर्षांपासून दारूपासून दूर राहिलाय बॉलिवूड अभिनेता, लवकर थकायचा आणि…

एप्रिल 15, 2026 | 11:49 am
rakhi sawant desinger dress
Entertainment

‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी १२ लाखाचा ड्रेस, राखी सावंतची जय्यत तयारी, दुबईला जाऊन…

एप्रिल 15, 2026 | 11:08 am
Next Post
flood on raam charan film set

Video : अनेक जखमी, लाखोंचं नुकसान अन्...; राम चरणच्या चित्रपटाच्या सेटवर पूर परिस्थिती, भयावह व्हिडीओ समोर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.