कलाकारांचे अनेक किस्से नेहमीच कानावर पडतात. एखाद्या अभिनेत्रीने एखाद्या अभिनेत्याला कानाखाली मारली आहे किंवा एखाद्या अभिनेत्याने अभिनेत्रीच्या कानाखाली मारली किंवा काहींचा घटस्फोट झाला. असे अनेक मुद्दे नेहमीच ऐकू येतात. याशिवाय ही कलाकार मंडळी अभिनय व चित्रपटांव्यतिरिक्त त्यांच्या वैयक्तिक आयुष्यासाठी देखील चर्चेत असतात. जुन्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्री शर्मिला टागोर ही देखील अशीच एक अभिनेत्री आहे जी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिली आहे. तिने बॉलिवूड कलाकारांना सोडून क्रिकेटर मन्सूर अली खान पतौडीसह लग्न केले. शर्मिला यांना सेटवर एका अभिनेत्याने कानाखाली मारली होती, याबाबत त्या अभिनेत्याने स्वतःच खुलासा केला आहे. (Prosenjit Chatterjee Slapped Sharmila Tagore)
शर्मिला टागोरला कानाखाली मारणाऱ्या अभिनेत्याचे नाव प्रसेनजीत चॅटर्जी आहे. प्रसेनजीत चॅटर्जी बंगाली चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते आहेत. ते ज्येष्ठ अभिनेते विश्वजित चॅटर्जी यांचे पुत्र आहेत. बंगाली चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या प्रसेनजीत चॅटर्जीने बालकलाकार म्हणूनही पडद्यावर काम केले. नुकतीच प्रोसेनजीत चॅटर्जी यांनी मुलाखत दिली. सध्या अभिनेता त्याच्या आगामी ‘अजोग्यो’ या चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. दरम्यान, अभिनेत्याने त्याच्या बालपणातील एका घटनेबद्दल खुलासा केला.
प्रसेनजीतने शर्मिलाबरोबर ‘ये रात फिर ना आएगी’ चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केले होते. यावेळी प्रसेनजीतने शर्मिलाला सेटवर कानाखाली मारली. प्रसेनजीत चॅटर्जी याने ‘बॉलिवूड हंगामा’ला मुलाखत दिली आहे. यामध्ये त्याने त्याच्या लहानपणातील एका घटनेबद्दल सांगितले. अभिनेत्याने सांगितले की, “मला वाटतं मी चार-पाच वर्षांचा असावा, जेव्हा शर्मिला आंटीने नायक व नायिकेच्या भावनिक दृश्यावेळी माझ्या वडिलांच्या कानाखाली मारली होती”.
अभिनेत्याने पुढे सांगितले की शर्मिला टागोरने त्याला लंच ब्रेकमध्ये बोलावले होते. अभिनेता म्हणाला, “तिने (शर्मिला टागोर) मला बोलावून तिच्या मांडीवर बसवले आणि मी तिच्या कानाखाली मारली. आजही जेव्हा मी तिला भेटतो तेव्हा ती मला त्याच प्रसंगाची आठवण करुन देते आणि म्हणते की मी तुझ्या वडिलांच्या कानशिलात लगावली म्हणून तू माझ्या कानाखाली मारली होती”.