नीता अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी याने नुकतीच लग्नगाठ बांधली आहे. १२ जुलै २०२४ रोजी त्याने त्याची मैत्रिण राधिका मर्चंटबरोबर सात फेरे घेतले. या लग्नात बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंतचे सर्व कलाकार दिसले. सोशल मीडियावर अजूनही अनंत व राधिकाच्या लग्नाची चर्चा सुरु असून त्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. नुकताच त्यांच्या शाही विवाहसोहळ्यातील आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे जो राधिकाच्या कन्यादानाचा आहे. या व्हिडीओमध्ये नीता अंबानी हिंदू धर्मातील कन्यादानाचा अर्थ तिथे उपस्थित सर्व लोकांना समजावून सांगत असल्याचे दिसून येत आहे. नीता अंबानींचा हा व्हिडीओ काही वेळातच व्हायरल होत आहे. (Anant Ambani-Radhika Merchant Wedding)
व्हिडीओमध्ये नीता अंबानी कन्यादानाबद्दल सविस्तर माहिती देत आहेत. या लग्नाला आल्याबद्दल सर्वप्रथम ती सर्वांचे आभार मानते. “माझ्या हृदयाचे तुकडे अनंत व राधिका आज एकत्र येत आहेत याचा मला खूप भावनिक आनंद झाला आहे. हिंदू धर्मात लग्न म्हणजे एका आयुष्यासाठी नव्हे तर सात आयुष्य एकत्र राहण्याचे वचन आहे. प्रत्येक जन्मात तुम्हाला तुमचा जोडीदार मिळेल हा विश्वास आहे. लग्नात कन्यादान हा विधी सर्वात खास आहे. ज्यामध्ये वधूचे पालक त्यांच्या मुलीला वराकडे सोपवतात. मी पण कोणाची तरी मुलगी आहे, मुलीची आई आहे आणि सूनेची सासू आहे. मला चांगलं माहीत आहे की, कोणताही पालक आपल्या मुलांना स्वतःपासून दूर ठेवू शकत नाही, कारण मुली या आई-वडिलांसाठी वरदान असतात, त्या लक्ष्मीचे रुप असतात”.
नीता अंबानी पुढे म्हणाल्या, “आमच्या मुली आमच्या घराला स्वर्ग बनवतात. स्त्री पूजनीय आहे. ती आई व अन्नपूर्णा आहे. ती आनंद, समृद्धी व संपत्ती आणते. स्त्रीला अनंताची अनंत जाणीव असते. कन्यादान करणे कोणत्याही पालकांसाठी सोपे नाही”. त्यानंतर ती राधिकाच्या आई-वडिलांचे सांत्वन करते आणि म्हणते, “तुम्ही आम्हाला तुमची मुलगीच देत नाही, तर तुमच्या कुटुंबात मुलाचेही स्वागत करत आहात. राधिका जितकी आमची तितकीच अनंत तुमचा आहे. मी व मुकेश तुम्हाला वचन देतो की, आम्ही आमची मुलगी ईशाची जशी काळजी घेतो तशी आम्ही तुमची मुलगी राधिकाची काळजी घेऊ”.
नीता अंबानी पुढे म्हणाल्या, “ती नेहमीच राधिकाला अनंतची सोलमेट म्हणून ठेवेल आणि नेहमीच तिची काळजी घेईल. ईशा, अनंत, श्लोका, आकाश, जसे पृथ्वी, आद्य, कृष्ण, वेद, राधिका, आणि आम्ही मिसेस राधिका अनंत अंबानी म्हणून तुझे स्वागत करतो”. नीता अंबानींचे हे भाषण ऐकल्यानंतर मुकेश अंबानी यांच्यासह तेथे बसलेले बहुतांश पाहुणे भावूक झाले. नीता अंबानींचा हा व्हिडीओ चर्चेत आहे.