आज सर्वत्र आषाढी एकादशीचा सोहळा साजरा केला जात आहे. एकादशीनिमित्त सर्वत्र भक्तिमय वातावरण आहे. पंढरपूरची नगरी हरिनामाच्या गजरात तल्लीन झाली आहे. सर्वजण आज हरिनामाच्या नामस्मरणात दंग आहेत. प्रत्येक भाविक आपल्या परीने विठुरायाची आराधना करत आहेत. पंढरपूरच्या विठूरायाचे दर्शन घेण्यासाठी प्रत्येक वारकऱ्याचे डोळे आसुसलेले असतात. सामान्य वारकऱ्यांसह अनेक कलाकारही या पंढरपूरच्या पांडुरंगाचे दर्शन घ्यायला जात असतात. अशातच ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेच्या कलाकारांनीही परदेशात एकादशी साजरी केली आहे.
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेची संपूर्ण टीम सध्या परदेशी गेली आहे. सध्या ही टीम एकत्र असून थायलंड, फुकेट येथे धमाल मस्ती करत आहे. इतकंच नव्हे तर भारताबाहेर ही संपूर्ण टीम चित्रीकरणासाठी रवाना झाली. अक्षरा व अधिपती यांना घेऊन मालिकेची संपूर्ण टीम रवाना झालेली पाहायला मिळाली. निर्माती शर्मिष्ठा राऊत हीदेखील कलाकारांसह परदेशी रवाना झाली आहे. परदेशी चित्रीकरणाचा आनंद घेण्यासाठी ही टीम सज्ज आहे. याचा सुंदर व्हिडीओ सर्व प्रेक्षकांना पाहायला मिळाला. अशातच आता या टीमचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
आज आषाढी एकादशीनिमित्त ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ टीमने थायलंडमध्ये हरीनामाचा गजर केला आहे. यावेळी सर्वांनी अगदी पारंपरिक पोशाख केला असल्याचे या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या टीमने आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोधल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून अनेकांनी या टीमचे कौतुक केलं आहे.
आणखी वाचा – “माझं लग्न…”, वैवाहिक आयुष्याबद्दलच्या अफवांवर गीता कपूर यांनी सोडलं मौन, म्हणाल्या, “मी गुपचूप…”
दरम्यान, ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’च्या टीमने परदेशी जाऊन केलेलं चित्रीकरण लवकरच मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मालिकेत अक्षरा व अधिपती यांचा हनिमून सिक्वेन्स पाहायला मिळत आहे. त्यामुळे याच सिक्वेन्ससाठी हे कलाकार थायलंडला गेले असल्याचे पाहायला मिळणार आहे. त्यामुळे मालिकेत हे सर्व मालिकेत पाहणं खूपच रंजक ठरणार आहे.