शुक्रवार, मे 9, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अभिनेत्री मधुबाला यांच्या बायोपिकची घोषणा, पण ही महत्त्वाची भूमिका नक्की कोणती अभिनेत्री साकारणार ?, ‘या’ नावांची चर्चा

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 16, 2024 | 12:56 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Madhubala Biopic

अभिनेत्री मधुबाला यांच्या बायोपिकची घोषणा, पण ही महत्त्वाची भूमिका नक्की कोणती अभिनेत्री साकारणार ?, 'या' नावांची चर्चा

हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये अभिनेत्री मधुबाला यांचं नाव आवर्जून घेतलं जातं. १४ फेब्रुवारी १९३३ रोजी मधुबाला यांचा जन्म झाला. मुमताज जहान बेगम नहलवी हे त्यांचं खरं नाव . त्यांनी साकारलेली ‘मुघल-ए-आझम’ या अजरामर चित्रपटातील ‘अनारकली’ भूमिका आजही सगळ्यांच्या लक्षात आहे. याबरोबरच त्यांनी ‘मिस्टर अँड मिसेस ५५’, ‘चलती का नाम गाडी’, ‘काला पानी’, ‘हावडा ब्रिज’,’नील कमल’ अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी महत्त्वाच्या भूमिका केल्या आहेत. त्यांच्या सर्वच भूमिकांना प्रेक्षकांचे भरघोस प्रेम मिळालं आहे. (Madhubala Biopic)

मधुबाला यांनी हिंदीमध्ये अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेते दिलीप कुमार व त्यांच्या प्रेमाची चर्चा सर्वत्र होत होती. मात्र काही कारणांमुळे ते एकमेकांपासून वेगळे झाले. त्यानंतर त्यांनी अभिनेते किशोर कुमार यांच्याबरोबर १९६० साली लग्न केले. पण वयाच्या अवघ्या ३६व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. ‘ज्वाला’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट असून अभिनेते सुनील दत्त यांच्याबरोबर त्या दिसल्या होत्या. पण आता पुन्हा त्यांना पडद्यावर बघण्याची संधी मिळणार आहे. मधुबाला यांच्या जीवणार बायोपिक तयार होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

आणकी वाचा- …म्हणून लेकीसह भारतात परतली प्रियांका चोप्रा, ईशा अंबानीलाही भेटायला गेली अन्…; खरं कारण आलं समोर

View this post on Instagram

A post shared by Mumtaz Jehan Begum Dehlavi ???? (@madhubala.forever)

दिग्दर्शक जसमित के रीन या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असल्याचेही समोर आले आहे. याआधी जसमितने आलिया भट्ट व विजय वर्मा यांचा ‘डार्लिंग्स’ हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. मधुबाला यांच्या बायोपिक सोनी पिक्चर्स इंटरनॅशनल प्रोडक्शन व Brewing Thoughts Pvt. Ltd यांनी इन्स्टाग्राम पोस्ट करत अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटाची निर्मिती मधुबाला यांची बहीण मधुर ब्रिज भूषण व अरविंद कुमार मालवीय करणार आहेत.

आणखी वाचा – ‘तारक मेहता…’मधून किती कमावते बबिता?, मुनमुन दत्ताचं एका एपिसोडचं मानधन आहे तब्बल…

मधुबाला यांच्या  बायोपिकची घोषणा होताच चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. तसेच मधुबाला यांच्या भूमिकेसाठी कोणाची निवड करण्यात यावी याबद्दलही मतं मांडण्यात आली आहेत. काहींनी अभिनेत्री आलिया भट्टचे नाव घेतले आहे तर काही जणांचे म्हणने आहे की या भूमिकेसाठी दक्षिणात्य अभिनेत्री अनुष्का शेट्टीची निवड करण्यात यावी. मात्र बरेच जणांनी अभिनेत्री मृणाल ठाकूरचे नाव घेतलं आहे. अनेकांनी ‘सीतारमण’ या चित्रपटातील तिच्या भूमिकेची सांगड मधुबाला यांच्याशीही घातली आहे. पण आता मधुबाला यांच्या भूमिकेसाठी कोणाची निवड होणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे.

Tags: actress madhubalabiopicbollywood actresshindi actressmadhubala
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Neha Kakkar Attends Driver Wedding 
Entertainment

नेहा कक्करची ड्रायव्हरच्या लग्नात उपस्थिती, नवरी मुलगी नमस्कार करण्यास खाली वाकताच घेतलं जवळ, गायिकेच्या कृतीने जिंकलं मन

मे 9, 2025 | 1:03 pm
virat kohli and rahul vaidya fight
Entertainment

विराट कोहलीला डिवचनं राहुल वैद्यला पडलं महागात, क्रिकेटरच्या भावाने सुनावलं, म्हणाला, “मूर्ख, फॉलोवर्स वाढवण्यासाठी…”

मे 9, 2025 | 12:30 pm
soldier duty over marriage
Social

हळद फिटली नसतानाही जवान लग्नाच्या तिसऱ्या दिवशी कामावर रुजू, आई-वडील भावुक तर पत्नीचा खंबीर पाठिंबा, मन हेलावणारा व्हिडीओ

मे 9, 2025 | 11:22 am
Akshay Kelkar Haldi Ceremony
Entertainment

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याला लागली हळद, घरीच कुटुंबियांसह सेलिब्रेशन, मराठी कलाकारांची हजेरी

मे 9, 2025 | 10:56 am
Next Post
Squid Game fame Oh Yeong Soo sentenced to 8 months in prison after serious allegations of sexual abuse

‘स्क्विड गेम' फेम ओह येओंग सूवर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप, न्यायालयाकडून आठ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा अन्...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.