बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राची जाऊबाई सोफी टर्नरने काही दिवसांपूर्वी घटस्फोटाची घोषणा केली आहे. सोफीने २०१९ मध्ये निक जोनसचा मोठा भाऊ जो जोनसबरोबर विवाह केला होता. मात्र, लग्नाच्या अवघ्या चार वर्षातच हे दोघे वेगळे झाले आहे. मागील आठवड्यात या दोघांनी घटस्फोट घेत असल्याची माहिती दिली होती. अशातच ‘गेम ऑफ थ्रोन्स’ फेम अभिनेत्रीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती एका अभिनेत्याला किस करताना दिसत आहे. (Sophie Turner viral video after separation)
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये सोफी टर्नर स्पेनमध्ये ‘जोन’ नावाच्या सीरिजचे शूटिंग करत आहे. ज्यात ती एक सीन करताना तिचा सहकलाकार फ्रँक डिलनला किस करत आहे. पुढे सोफी आणि फ्रँक समुद्रात मस्ती करताना दिसत असून दोघेही एकमेकांवर पाणी उडवताना, हसताना दिसत आहेत. त्याचदरम्यान, ते एकमेकांना किस करताना दिसत आहेत. या दोघांचा हा व्हिडिओ अभिनेत्याच्या अनधिकृत ट्विटर अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओ व्हायरल होताच याची जोरदार चर्चा रंगत आहे.
Frank Dillane and Sophie Turner spotted filming at Joan’s set in Spain!
— Frank Dillane News (@dillanedaily) September 15, 2023
via splash! pic.twitter.com/EOeAmNlfay
हे देखील वाचा – “मसाज करणाऱ्या बाईने मला…”, वाढत्या वजनावरुन हिणावल्यानंतर रडू लागली विद्या बालन, म्हणाली, “माझ्या शरीराबाबत…”
सोफी टर्नर व फ्रँक डिलन ‘जोन’ या आगामी सीरिजमध्ये झळकणार आहे. ज्यामध्ये सोफी ब्रिटिश ज्वेल चोर जॉन हॅनिंग्टनची भूमिका साकारणार आहे. तर फ्रँक तिच्या पतीची भूमिका करतोय. इंग्लंडमध्ये मे महिन्यात या सीरिजच्या शूटिंगला सुरुवात झाली होती. अभिनेत्याबद्दल बोलायचे झाल्यास, ‘फिअर द वॉकिंग डेड’ आणि ‘हॅरी पॉटर अँड द हाफ-ब्लड प्रिन्स’ मधील भूमिकांसाठी फ्रँक डिलन ओळखला जातो.
हे देखील वाचा – Video : ‘आई कुठे काय करते’ फेम मधुराणी प्रभुलकरने घाटात चालवली गाडी, म्हणाली, “गाडी चालवता येणं…”
दरम्यान, निक जोनसचा भाऊ जो आणि सोफी टर्नर २०१६ मध्ये एकमेकांना भेटले होते. त्यांनी काही वर्ष डेट केल्यानंतर २०१९ मध्ये हे दोघे विवाहबंधनात अडकले होते. या जोडीला दोन मुली असून लग्नाच्या चार वर्षांनी ते दोघे वेगळे होत आहेत.