रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : ‘आई कुठे काय करते’ फेम मधुराणी प्रभुलकरने घाटात चालवली गाडी, म्हणाली, “गाडी चालवता येणं…”

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
सप्टेंबर 16, 2023 | 4:58 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Madhurani Prabhulkar AKKK

Video : 'आई कुठे काय करते' फेम मधुराणी प्रभुलकरने घाटात चालवली गाडी, म्हणाली, "गाडी चालवता येणं…"

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांमध्ये गणली जाणारी मालिका म्हणजे स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’. आणि या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली लाडकी अरुंधती म्हणजे अभिनेत्री मधुराणी प्रभूलकर. मालिकेतील मधुराणीच्या पात्राला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतला असून तिची विशेष फॅन फॉलोविंग निर्माण झाली आहे. मधुराणी सोशल मीडियावर सक्रिय असून ती या माध्यमातून अनेक व्हिडिओज व फोटोज तिच्या चाहत्यांसमोर शेअर करत राहते. असाच एक व्हिडिओ तिने नुकतंच शेअर केला असून तिच्या या व्हिडिओची सर्वत्र चर्चा होत आहे. (Madhurani Prabhulkar AKKK)

मधुराणी सध्या मालिकेच्या शूटिंगमध्ये व्यग्र असून तिने शूटवरील एक व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये मधुराणी घाटात चारचाकी गाडी चालवताना दिसत असून यावेळी तिला आलेला अनुभव या व्हिडिओबरोबरच्या पोस्टमध्ये शेअर केला आहे. मधुराणी या पोस्टमध्ये म्हणते, “रोज नवीन काहीतरी शिकत असतो आपण…! गाडी चालवायला आवडतेच मला. पण तशी उशीरा शिकले चालवायला … अलिकडेच म्हणायला हवं. गाडी येणं ह्याचे अनेक फायदे वेळोवेळी अनुभवले. पण अशी कधी गाडी चालवू असा विचारही केला नव्हता.”

हे देखील वाचा – “तुझी लाज वाटते”, नाचतानाचा व्हिडीओ शेअर केल्यामुळे अंकिता लोखंडे ट्रोल, नेटकरी म्हणाले, “वडील जाऊन महिनाही झाला नाही आणि…”

View this post on Instagram

A post shared by Madhurani Gokhale Prabhulkar (@madhurani.prabhulkar)

“रिंग, कॅमेरा, आणि घाटातला प्रवास… त्यात घाटात गाडी सांभाळायची, संवाद म्हणायचे, इमोशन्स सांभाळायच्या, रस्त्यावरचं लक्ष ढळू द्यायचं नाही.. ही तारेवरची कसरत होती. सुरुवातीला जरा भीती वाटली पण नंतर मजा यायला लागली. भीतीची भावना पार केली तरच अनुभव गाठीशी गोळा होतात. नाहीतर आपण तिथेच राहतो, नाही का !” असं मधुराणी यात म्हटली आहे. तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी प्रतिक्रियांचा पाऊस पाडला आहे.

हे देखील वाचा – मराठमोळ्या गायिकेला मिळाली सचिन तेंडुलकरसमोर गाण्याची संधी, अनुभव शेअर करत म्हणाली, “समोरच्या व्यक्तीचा आदर करणं…”

मधुराणी प्रभूलकरला चारचाकी वाहने चालवण्याची प्रचंड आवड असून याआधीच्या व्हिडिओमधून तिने तिचे वाहनप्रेम दाखवलं आहे. याबरोबरच ती युट्युब चॅनेलमधून तिच्या कविता चाहत्यांसमोर सादर करत असते. तर ‘आई कुठे काय करते’ बाबत बोलायचे झाल्यास मालिका आता वेगळ्याच वळणावर आलेली आहे. ईशाचं लग्न झाल्यानंतर अरुंधती आशुतोशसोबत हनिमूनला निघालेले असतात. मालिकेत आता रोमँटिक ट्रॅकवर आली असून पुढील भागात प्रेक्षकांना काय पाहायला मिळणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Tags: aai kuthe kaay kartearundhatimadhurani prabhulkarviral video
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
rupali bhosle shared her divine experience

'आई कुठे काय करते' फेम रुपाली भोसलेने सांगितला कोल्हापुरच्या महालक्ष्मीचा अनुभव, म्हणाली, "त्या आईनेच सगळं केलं कारण…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.