चित्रपट, मालिका यांविषयी प्रेक्षकांना आपलेपणा वाटतो.पण ही नाळ जोडलेली आहे ती नाटका सोबत.अनेक कलाकार त्यांच्या कामाची सुरुवात नाटकापासून करतात. आपल्या आवडत्या कलाकारांना प्रत्यक्ष काम करताना पाहणं ही प्रेक्षकांसाठी नक्कीच पर्वणी आहे. म्हणूनच आजही प्रेक्षक नाटकाकडे वळताना पाहायला मिळतात. प्रयोग संपल्या नंतर आवडत्या कलाकारांना जाऊन भेटणं त्यांच्यासोबत फोटो काढणं, त्यांची सही घेणं आजही त्या गोष्टींना तितकंच महत्व आहे.(Priyadarshini Share Old Memory)
अशीच एक आठवण अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकरने शेअर केली आहे.उमेश कामत आणि प्रिया बापट ही सर्वांचीच आवडती जोडी आहे.त्यांच्या नवा गडी नवं राज्य या नाटकाच्या वेळेला प्रिया आणि उमेश सोबत काढलेले हे फोटोज आणि त्यानंतर प्रियदर्शनीच्या फुलराणी चित्रपटाच्या प्रीमियरच्या वेळेचे त्यांच्या सोबतचे फोटो प्रियदर्शनीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर केले आहेत.
पाहा काय आहे प्रियदर्शनीची १३ वर्षांपूर्वीची खास आठवण?(Priyadarshini Share Old Memory)
या फोटोजच्या कॅप्शन मध्ये प्रियदर्शनीने म्हंटल आहे, दहावी मध्ये ‘नवा गडी नव राज्य’ च्या प्रयोगा नंतर बॅकस्टेज ला जाऊन फोटो काढलेले, त्यांनतर जवळपास १३ वर्षांनी फोटो काढले,’फुलराणी’ च्या प्रीमिअर नंतर. त्यांच्या डोळ्यात माझ्या साठी प्रेम आणि काळजी बघून त्या प्रीमिअरच्या रात्रीचा तो क्षण माझ्यासाठी खास होता.बहोत प्यार.तसेच प्रियदर्शनीच्या या पोस्टवर आईगं काय कमाल आठवण आहे ही. तू एक उत्तम अभिनेत्री आहेस. आणि या सगळ्या प्रेमाची तू हकदार आहेस अशी कमेंट प्रियाने केलेली पाहायला मिळते.(Priyadarshini Share Old Memory)
नक्कीच एका कलाकारासाठी ही बेस्ट फॅन मोमेन्ट आणि अभिमानास्पद गोष्ट आहे.ज्या कलाकारांना आपण बघत मोठे होतो. त्या कलाकारांसोबत सिनेसृष्टी सोबत स्वतःच एक स्थान निर्माण करणं ही एक मोठी गोष्ट आहे.हास्यजत्रेमधून प्रियदर्शनी घराघरात पोहचली, आणि मोठ्या पडद्यावरही फुलराणी च्या माध्यमातून प्रियदर्शनीने तिच्या कामाची छाप पडली.
हे देखील वाचा : इंडियन आयडॉल विजेता अभिजित सावंतच्या कुटुंबाला पाहिलंत का ?