‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कॉमेडी शोमधून अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकर घराघरांत पोहोचली. तर अभिनेता ओंकार राऊतने त्यांच्या विनोदी शैलीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. प्रियदर्शिनी आणि ओंकार हे काही दिवसांपासून विशेष चर्चेत आहेत. या दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चांना उधाण आलं होतं. आता प्रियदर्शिनी आणि ओंकार पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. नुकताच ओंकारचा वाढदिवस झाला, त्यानिमित्त प्रियदर्शिनीने ओंकारला दिलेल्या शुभेच्छांची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. (Priyadarshini Indalkar on Onkar Raut)
ओंकारच्या वाढदिवसानिमित्त प्रियदर्शनीने ओंकारसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. तिने शेअर केलेल्या पोस्टमध्ये प्रियदर्शनीने ओंकारचा एक खाजगी व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओच्या बॅकग्राउंडला बिग बॉसचा टाईम अलार्म वाजत असून ओंकार या व्हिडिओत सतत झोपताना दिसत आहे. कधी बेडवर तर कधी सोफ्यावर तर कधी तो गाडीतच विश्रांती घेताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत प्रियदर्शनीने कॅप्शनमध्ये “जागतिक आळसदिनाच्या शुभेच्छा ! Happy birthday” असं कॅप्शन दिलं आहे.
पाहा प्रियदर्शिनीच्या पोस्टवर ओंकार काय म्हणाला (Priyadarshini Indalkar on Onkar Raut)
प्रियदर्शिनीने शेअर केलेल्या या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंटचा वर्षाव केला आहे. यावर ओंकारने केलेली कमेंट अधिक लक्षवेधी ठरतेय. ओंकारने कमेंट करत म्हटलंय की, “याची जर कॉंट्रोव्हर्सी झाली तर मला सांगू नकोस”. यावर प्रियदर्शिनीने उत्तर देत म्हटलं आहे की, “तर मग काही खरं नाही माझं, स्वतःच्या पायावर…असो” असं म्हणत कमेंट केली आहे. तर यावर एका नेटकऱ्याने कमेंट करत म्हटलं आहे की, “एवढे फोटो उगाच कोण काढत नाही, जमलंय अस समजायला एवढं पुरे आहे”.
अभिनेत्री वनिता खरात आणि सुमित लोंढे यांच्या लग्नाच्या वेळी हास्यजत्रेतील बऱ्याच कलाकारांनी हजेरी लावली होती. त्यावेळी ओंकार राऊत आणि प्रियदर्शिनी इंदलकरही उपस्थित होते. ओंकार राऊतसोबत प्रियदर्शिनीने एक फोटो शेअर केला, यात प्रियदर्शनी आणि ओंकार याच्या हटके पोजमुळे सोशल मीडियावर चांगलीच रंगली, प्रियदर्शनीने ओंकारच्या छातीवर हात ठेवून हा फोटो काढला होता त्यामुळे या फोटोवरुन अनेक चाहत्यांनी प्रियदर्शिनी ओंकारमध्ये नेमकं काय अस विचारलं होत.