असं बऱ्याच वेळा म्हणलं जात जोड्या स्वर्गात जोडल्या जातात पण जुळलेल्या जोड्या टिकवणं मात्र हे सर्वस्वी त्या जोडप्याच्या हातात असत. एकमेकांच्या आवडीनिवडीत दखल न देता एकमेकांवर निस्वार्थ प्रेम करणाऱ्या अनेक जोड्या आपल्या मराठी मनोरंजन क्षेत्रात आहेत. या जोड्यांपैकी काही जोड्या नेहमीच एकमेकांसोबतचे फोटोज, रील शेअर करताना दिसतात. आणि प्रेक्षकही या कलाकारांवर भरभरून प्रेम करताना दिसतात.(Shantanu Moghe Priya Marathe)

या जोड्यांपैकी एक प्रसिद्ध जोडी म्हणजे अभिनेते शंतनू मोघे आणि अभिनेत्री प्रिया मराठे. आज प्रेक्षकांच्या या आवडत्या जोडीच्या लग्नाचा वाढदिवस आहे. त्या निम्मित अभिनेत्री प्रियाने शंतनूसोबतचा एक फोटो पोस्ट करत लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
प्रिया आणि शंतनू नेहमीच त्यांचे सुंदर फोटोज सोशल मीडिया वर पोस्ट करत असतात आणि चाहते ही त्यांच्या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत असतात.(Shantanu Moghe Priya Marathe)
हे देखील वाचा – म्हणून अशोक सराफ नानांना म्हणाले..’काय नान्या श्रीमंत झालास का?’
शंतनू मोघे छत्रपती शिवाजी महाराज यांची अजरामर भूमिका साकारून प्रेक्षकांच्या चांगलेच समरणात राहिले आहेत तर रंगभूमीवर त्यांचं सफरचंद नाटक ही चांगलंच सुरु आहे. अभिनेत्री प्रिया देखील स्टार प्रवाह वरील तुझेच मी गीत गात आहे या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.