Prithvik Pratap Wedding : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम जगभरात लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमांतून अनेक नवोदित कलाकारांना प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण करण्याची खूप मोठी संधी मिळाली. हास्यजत्रेच्या माध्यमातून पृथ्वीक प्रताप हा अभिनेताही घराघरांत पोहोचला आहे. नुकताच पृथ्वीक प्रताप लग्नबंधनात अडकला आहे. पृथ्वीकने त्याची गर्लफ्रेंड प्राजक्ता वायकूळशी लग्नगाठ बांधली. पृथ्वीक व प्राजक्ता यांनी शुक्रवारी (२५ ऑक्टोबरला) अत्यंत साधेपणाने निसर्गाच्या सानिध्यात लग्न केलं. अगदी मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत त्यांचा लग्नसोहळा पार पडला.
थेट लग्नाचे खास फोटो शेअर करत त्याने चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली. साधेपणाने केलेल्या या लग्नातील त्यांचा लूक मात्र खूप लक्षवेधी ठरला. लग्नासाठी पृथ्वीकने पांढरा कुर्ता व त्यावर धोतर आणि पायात मोजडी असा खास लूक केला होता. तसंच या पेहरावावर त्याने मोगऱ्याच्या फुलांच्या वरमाळा परिधान केल्या आहेत. तर त्याची पत्नी प्राजक्ता हिने ऑफ व्हाईट व सोनेरी रंगाची साडी नेसली होती. तर या साडीवर गळ्यात सुंदर हार आणि कानात झुमके असे साजेसे दागिनेही परिधान केले. हातावरील मेहंदी व हिरव्या चुड्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
आणखी वाचा – “तुमची मुलगी प्लेन क्रॅशमध्ये…”, काजोलच्या मृत्यूची बातमी ऐकताच आईला बसला धक्का, प्रसंग सांगत म्हणाली…
यानंतर अभिनेत्यावर कलाकारांकडून शुभेच्छांचा वर्षाव होताना पाहायला मिळाला. पृथ्वीकच्या लग्नाला प्रथमेश परबनेही हजेरी लावली होती. प्रथमेशने पृथ्वीक व प्राजक्ताबरोबरचा फोटो शेअर करत त्यांचं अभिनंदन केलं. यावेळी प्राजक्ताच्या गळ्यातील मंगळसूत्राने साऱ्यांचं लक्ष वेधलं. प्राजक्ताच्या गळ्यातील मंगळसूत्राच्या साध्या व सुंदर अशा डिझाइनने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. यामध्ये काळे मणी व दोन डवल्या आहेत. पारंपरिक मंगळसूत्राला खास मॉर्डन टच देण्यात आला असल्याचं दिसलं.
आणखी वाचा – Video : सोनाली बेंद्रे व ओरीने उडवली जया बच्चनची खिल्ली, व्हिडीओ शेअर करताच सगळे पाहतच राहिले अन्…
पृथ्वीकने लग्नातील काही अनसीन फोटो शेअर केले आहेत. “झाड मातीच्या सलोख्या इतकं, घट्ट नातं जुळावं, बहरावी प्राजक्ता हर जन्मी अन् वसुंधरेस मी मिळावं!” असं कॅप्शन पृथ्वीकने या फोटोंना दिलं आहे.