झी मराठी वाहिनीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली परी म्हणजेच बालकलाकार मायरा वायकुळ. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालितकेमुळे ती मराठी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा बनली. या मालिकेनंतर ती अनेक जाहिराती आणि इतर कार्यक्रमांतही झळकली. या मालिकेनंतर मायरा सतत चर्चेत असते. मायरा वायकुळ नुकतीच मोठी ताई झाली. तिच्या घरी एका चिमुकल्या बाळाचे आगमन झालं. मायराने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांबरोबर शेअर केली होती. अशातच आता तिने आपल्या लहान भावाचे काही खास फोटो पहिल्यांदाच शेअर केले आहेत. (Myra Vaykul Little Brother First Photo)
मायराच्या सोशल मीडिया अकाउंटद्वारे तिच्या लहान भावाचे काही क्युट फोटो शेअर करण्यात आले आहेत. पहिल्यांदाच हे फोटो शेअर करण्यात आले आहे आहेत. “हॅलो वर्ल्ड” म्हणत या बेबी वायकुळचा चेहरा मायराच्या आई-बाबांनी लहान बाळाचा चेहरा दाखवला आहे. त्यामुळे मायरा आणि तिच्या चिमुकल्या भावाचे हे गोड फोटोस सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. वायकुळ कुटुंबीयांच्या घरी चिमुकल्या सदस्याच्या आगमनामुळे आनंदाचं वातावरण आहे.
आणखी वाचा – Video : सोनाली बेंद्रे व ओरीने उडवली जया बच्चनची खिल्ली, व्हिडीओ शेअर करताच सगळे पाहतच राहिले अन्…
मायराच्या लहान भावाच्या फोटोमधील पहिला फोटो फारच सुंदर आहे. या फोटोत बाळाच्या चेहऱ्यावर स्माईल पाहायला मिळत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये बाळ शांत झोपलेले पाहायला मिळत आहे. तर तिसऱ्या फोटोमध्ये मायरा आपल्या लहान भावाच्या गालावर किस करत आहे. मायराचे आणि तिच्या या लहान भावाचे फोटो खूपच लक्षवेधी आहेत. मायरा पाठोपाठ तिच्या चिमुकल्या भावाचीदेखील इन्स्टाग्रामवर एन्ट्री झाली आहे. आपल्या दोन्ही मुलांचे सोशल मीडिया अकाऊंट्स मायराचे आई-बाबा म्हणजेच श्वेता व गौरव वायकुळ हँडल करतात.
आणखी वाचा – पृथ्वीक प्रतापच्या बायकोच मंगळसूत्र आहे खूपच खास, सोशल मीडियावर रंगली चर्चा, डिझाइनने वेधलं लक्ष
दरम्यान, मायराच्या लहान भावाच्या या फोटोला नेटकऱ्यांनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. या फोटोखाली प्रार्थना बेहेरे व काजल काटे यांसह अनेक कलाकारांनी व चाहत्यांनी कमेंट्स कमेंट करत मायराच्या लहान भावाचे कौतुक केलं आहे. अनेकांनी “मायराचा लहान भाऊ अगदी तिच्यासारखाच दिसतो”, “फारच क्युट”, “फारच छान”, “खूप गोंडस” अशा अनेक कमेंट्स करत नेटकऱ्यांनी या फोटोला प्रतिसाद दिला आहे.