Paaru Serial Promo : सध्या मालिकाविश्वात अनेक मालिकांमध्ये नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. मालिकेत येणारे ट्विस्ट बघण्यासाठी प्रेक्षक देखील खूप उत्सुक असतात. तर सध्या झी मराठीवरील ‘पारू’ ही मालिका चांगलीच चर्चेत आहे. मालिकेचं कथानक अत्यंत उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. आणि यामुळे ही मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहे. पारू आणि आदित्य यांचं आयुष्य एका नव्या टप्प्यावर येऊन पोहोचलं आहे. मालिकेत आदित्य आणि पारू यांच्या लग्नाचं गुपित अखेर अहिल्यादेवी किर्लोस्कर यांच्यासमोर आलं आहे. ही बातमी ऐकताच अहिल्यादेवींचा राग अनावर होतो आणि त्या आदित्य-पारूला घराबाहेर काढतात.
ज्यामुळे आदित्य आणि पारू त्यांच्या नव्या संसाराची सुरुवात करण्याचा निर्णय घेतात. तर आता ‘झी मराठी’ वाहिनीने या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे ज्यात पारू आदित्यला काही न सांगता निघून जाते आणि हे समजल्यावर आदित्य अत्यंत काळजीने तिला शोधण्यासाठी बाहेर पडतो. पारू सापडत नाही म्हणून तो सैरावैरा झालेला असतो. तर पारू एका मंदिराच्या पायथ्याशी हताश मबसलेली त्याला दिसते आणि त्याच्या जीवात जीव येतो.
आणखी वाचा – ‘कमळी’च्या टीमनं मारली बाजी, अनिकाची हार होताच झाला संताप; कोणता नवा डाव आखणार?, प्रोमो समोर
तर दुसरीकडे अहिल्यादेवीच्या मनात पारू आणि आदित्यबद्दल प्रचंड राग असतो. त्याच रागाच्या भरात अहिल्यादेवी आदित्यच्या सगळ्या वस्तू जाळण्यासाठी काढते. आणि ही गोष्ट प्रीतमला समजते. हे ऐकताच तो ही रॉकेल स्वतःच्या अंगावर ओतून घेतो. प्रीतमचा हा अवतार पाहून सगळेच घाबरतात. तर मंदिराजवळ आदित्य आणि पारूला एक जोगतीण भेटते. आणि ती त्यांना सावध करत म्हणते, जर या परिस्थितीत तुम्ही वेगळे झालात तर ही देवीच काय तुझी देवीआई सुद्धा तुझ्यापासून पाठ फिरवेल.
तर आता प्रीतमच्या भयावह कृतीबाबत आदित्य पारूला कळेल का?, ते दोघे त्याला वाचवण्यासाठी पुन्हा किर्लोस्कर वाड्यात येतील का?, आदित्य-पारूच्या आयुष्यात आणखी कोणतं नवं वादळ येणार हे सारं पाहणं मालिकेत मनोरंजक ठरणार आहे.





