Sayli Kamble Goodnews : कलाकार मंडळी नेहमीच त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन चाहत्यांसह त्यांच्या आयुष्यातील घडामोडी शेअर करतात. बरेचदा ही मंडळी आयुष्यातील चांगले-वाईट अनुभव शेअर करतात. अशातच एक सुप्रसिद्ध आणि लोकप्रिय गायिकेने आई होणार असल्याची आनंदाची बातमी चाहत्यांसह शेअर केली आहे. ही गायिका म्हणजे सायली कांबळे. सायली लवकरच आई होणार असल्याचं तिने शेअर केलेल्या पोस्टमधून समोर आलं आहे. सायलीने ही गुडन्यूज चाहत्यांसह शेअर केली आहे. लग्नाच्या अडीच वर्षांनी त्यांनी आई-वडील होण्याचा निर्णय घेतला आहे.
सायली कांबळेने बॉयफ्रेंड धवलसह २०२२ मध्ये लग्नगाठ बांधली. पारंपारिक महाराष्ट्रीयन पद्धतीने त्यांनी अगदी थाटामाटात लग्न केले. लग्नाच्या अडीच वर्षानंतर ते आई-बाबा होणार आहेत. थेट इंस्टाग्रामला सायलीने डोहाळ जेवणाचा फोटो शेअर करत ही गुडन्यूज दिली आहे. समोर आलेल्या या फोटोमध्ये सायली तिचा पती धवलसह दिसतेय, यावेळी दोघेही एकमेकांकडे पाहत प्रेम व्यक्त करताना दिसत आहेत. तर धवलने सायलीच्या बेबी बंपवर हात ठेवत पोज दिली आहे.
आणखी वाचा – प्रीतमचा आत्महत्येचा प्रयत्न, पारू-आदित्य जीव वाचवायला येणार का?, मालिकेत मोठा ट्विस्ट
दोघेही डोहाळ जेवणासाठी पारंपरिक अंदाजात तयार झाले आहेत. यावेळी सायलीने सुंदर अशी हिरव्या रंगाच्या काठापदराची साडी नेसली होती. तर धवलने ट्रेडिशनल कुर्ता परिधान केला होता. फुलांचे दागिने परिधान करत सायलीने हा लूक पूर्ण केला. दोघेही समोर आलेल्या फोटोमध्ये खूप खुश दिसत आहेत. सायलीने आई-बाबा होणार असल्याची आनंदाची बातमी देताच सोशल मीडियावर तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होताना पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा – ‘कमळी’च्या टीमनं मारली बाजी, अनिकाची हार होताच झाला संताप; कोणता नवा डाव आखणार?, प्रोमो समोर
“आमची अंतःकरणे आनंदाने आणि अपेक्षेने भरुन येत आहेत. आमचा छोटासा चमत्कार लवकरच घडणार आहे हे जाहीर करताना मला आणि धवलला खूप आनंद होत आहे. आम्ही आमच्या आयुष्यातील सर्वात अविश्वसनीय साहसाला सुरुवात करत आहोत आणि आमच्या मौल्यवान आनंदाच्या गठ्ठ्याला भेटण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. थोडासा ताराधूळ, थोडासा स्वर्ग आणि भरपूर प्रेम आमच्याकडे येत आहे”, असं कॅप्शन तिने या पोस्टला दिले आहे.





