रविवार, जून 14, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अमिताभ बच्चन यांच्या नव्या प्रॉपर्टीची किंमत ऐकून व्हाल थक्क, ऑफिससाठी घेतली इतकी महागडी जागा

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 26, 2024 | 12:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
amitabh bachchan

अमिताभ बच्चन यांच्या नव्या प्रॉपर्टीची किंमत ऐकून व्हाल थक्क, ऑफिससाठी घेतली इतकी महागडी जागा

अमिताभ बच्चन यांनी मुंबईतील तीन ऑफिस युनिट तब्बल ६० कोटी रुपयांना विकत घेतले असल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे. मुंबईतील नामांकित अशा अंधेरी वीरा देसाई रोडवर असलेल्या वीर सावरकर सिग्नेचर या बिल्डिंगमध्ये त्यांनी ही मालमत्ता खरेदी केल्याचे समोर आलं आहे. Floortap.com ने नोंदवलेल्या कागदपत्रांनुसार, अमिताभ यांनी या तीन ऑफिस युनिट्ससाठी ५९.५८ कोटी रुपये दिले आहेत, ज्याचे एकूण क्षेत्रफळ ८,४२९ स्क्वेअर फूट आहे. या डीलची विक्री ३० जून २०२४ रोजी तयार करण्यात आली होती. ज्यामध्ये अमिताभ यांनी या व्यावसायिक मालमत्तेसाठी ३.५७ कोटी रुपये मुद्रांक शुल्क भरल्याचे नमूद केले आहे. मालमत्तेच्या कागदपत्रांमध्ये हे देखील नमूद केले आहे की, तिनही कार्यालयीन युनिट्समध्ये कार पार्किंगसाठी ही भरपूर जागा आहे. अमिताभ यांनी ही व्यावसायिक मालमत्ता वीर सावरकर प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडकडून खरेदी केली आहे. (Amitabh Bachchan Property)

याबाबत अमिताभ यांच्याकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. बच्चन यांच्या सिग्नेचर बिल्डिंगमध्ये आधीच चार ऑफिस स्पेस आहेत. ऑगस्ट २०२३ मध्ये त्यांनी हे कार्यालय विकत घेतले. यानंतर, त्याच वर्षी डिसेंबर २०२३ मध्ये, त्याने ओशिवरा, मुंबई येथे अंदाजे १०,००० चौरस फुटांच्या या चारही व्यावसायिक युनिट्सचे वार्षिक भाडे २.०७ कोटी रुपये आणि १.०३ कोटी रुपये सुरक्षा ठेवीसह भाड्याने दिले होते. आता त्या तीन व्यावसायिक युनिट्ससह, बच्चन यांच्या सिग्नेचर बिल्डिंगमध्ये एकूण सात ऑफिस आहेत. काजोलने गेल्या वर्षी जुलैमध्ये याच बिल्डिंगमध्ये १९४ स्क्वेअर फूट व्यावसायिक जागा खरेदी केली होती.

आणखी वाचा – दिशा-दामिनीचं पितळ उघडं पडणार?, प्रीतमच्याही आयुष्यात नवी मुलगी आली अन्…; साखरपुडा मोडत प्रेमाची कबुली देणार का?

View this post on Instagram

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

या व्यतिरिक्त सारा अली खान आणि तिची आई अमृता सिंग यांनीही या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर एक युनिट ९ कोटी रुपयांना खरेदी केले होते, ज्याची नोंदणी ११ जुलै २०२३ रोजी झाली होती. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये, कार्तिक आर्यनने चौथ्या मजल्यावर १०.०९ कोटी रुपयांची व्यावसायिक जागा देखील खरेदी केली होती आणि या मालमत्तेसाठी त्याने ४७.५५ लाख रुपये मुद्रांक शुल्क भरल्याची माहिती आहे. या वर्षी मे २०२४ मध्ये अभिषेक बच्चनने मुंबईतील बोरिवली येथे १५.४२ कोटी रुपयांना एकूण ६ आलिशान घरं खरेदी केले होते. बोरिवलीच्या ओबेरॉय स्काय सिटीमध्ये एकूण ४,८९४ स्क्वेअर फुटांचे हे अपार्टमेंट्स आहेत.

आणखी वाचा – अस्तिकट्यारसाठी रुपालीकडून शेखरविरुद्ध प्रतिबिंब शक्तीचा वापर, विरोचकाला कट्यार मिळणार का?

अमिताभ यांच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, अमिताभ यांचा पुढचा चित्रपट ‘कल्की 2898 एडी’ २७ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर येताच अमिताभ यांच्या व्यक्तिरेखेचे ​​खूप कौतुक केले जात आहे. हा चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात काहीतरी जबरदस्त कामगिरी करणार असल्याचे बोलले जात आहे. हा चित्रपट पहिल्याच दिवशी जगभरात २०० कोटींची कमाई करेल, अशी आशा चित्रपट तज्ञांना आहे.

Tags: amitabh bachchanAmitabh Bachchan Propertybollywood gossipentertainment
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

krishnai chya leki serial
Entertainment

संगममाऊली घाटावर रंगला ‘कृष्णाईच्या लेकी’चा आगळावेगळा शुभारंभ, नव्या मालिकेची उत्सुकता

जून 12, 2026 | 4:40 pm
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah
Entertainment

‘तारक मेहता…’च्या पोपटलालचं खऱ्या आयुष्यात झालंय लग्न, कुटुंबांच्या विरोधात जाऊन केलाय प्रेमविवाह

जून 12, 2026 | 10:19 am
rs 370 biryani controversy
Entertainment

‘३७० रुपयांची बिर्याणी’ प्रकरण पडलं महागात, कॉमेडियन प्रणित मोरेला राष्ट्रीय महिला आयोगाकडून नोटीस, प्रकरण काय?

जून 12, 2026 | 9:58 am
Arjun Rampal interview
Entertainment

२० वर्षांचा संसार मोडला, आईचं कॅन्सरने निधन आणि…; सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याने सांगितला आयुष्यातील कठीण काळ, म्हणाला…

जून 10, 2026 | 11:50 am
Next Post
Rekha Income

१० वर्ष इंडस्ट्रीपासून दूर, कमाई नसतानाही कसं आयुष्य जगतात रेखा?, इतके महागडे कपडे, सगळा खर्च नक्की कसा करतात?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.