शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘प्रेमाची गोष्ट’मधील सागरची खऱ्या आयुष्यातील बायको दिसते इतकी सुंदर, अभिनय नव्हे तर ‘या’ क्षेत्रात आहे कार्यरत

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 14, 2024 | 8:30 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Raj Hanchanale Wife

'प्रेमाची गोष्ट'मधील सागरची खऱ्या आयुष्यातील बायको दिसते इतकी सुंदर, अभिनय नव्हे तर 'या' क्षेत्रात आहे कार्यरत

‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेमुळे अभिनेता राज हंचनाळे घराघरांत लोकप्रिय झाला. सध्या ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेतून तो प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेमध्ये राज सईच्या बाबांची म्हणजेच सागर ही व्यक्तिरेखा साकारत आहे. राजच्या या नव्या भूमिकेची सध्या प्रचंड चर्चा सुरु असलेली आहे. याशिवाय अभिनेता सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. (Raj Hanchanale Wife)

‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत सागर व मुक्ता यांच्यात प्रेम बहरताना दिसत आहे. सईची आई म्हणून मुक्ताने सागर शी लग्न केलं आहे. दरम्यान मुक्ता व सागर दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडलेले दिसत आहेत. दोघेही एकमेकांची काळजी घेताना दिसत आहेत. दोघांमध्ये फुलणार हे प्रेम रसिक प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. खऱ्या आयुष्यातही सागर म्हणजेच राजच लग्न झालं असून त्याची पत्नीही खूपच सुंदर आहे. दोघेही सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतात.

आणखी वाचा – “बाल अत्याचाराला खतपाणी का?”, ‘पारू’मध्ये लहान मुलाला मारत असल्याचा सीन पाहून प्रेक्षक संतापले, म्हणाले, “लाज वाटली पाहिजे की…”

View this post on Instagram

A post shared by Raj T Hanchanale (@raj_t_hanchanale)

अभिनेता राज हंचनाळेने खऱ्या आयुष्यात मनीषा ऊर्फ मॉली डेस्वाल हिच्याशी २०१९ मध्ये लग्न केलं. दोघंही २०१३ पासून एकमेकांना डेट करत होते. दोघांचे रोमँटिक फोटो तो नेहमीच शेअर करत असतो. राज आणि मोली दोघेही सध्या त्यांच्या कामात बिझी असले तरी एकमेकांना वेळ देत खास फोटो शेअर करताना दिसतात. राजची पत्नी मोली ही पेशाने चित्रकार आहे. ती तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन तिच्या हटके पेंटीग्स शेअर करताना दिसते.

आणखी वाचा – लग्नानंतरच्या पहिल्या रात्रीसाठी अक्षरा-अधिपतीचा कुटुंबियांनीच सजवला बेड, भुवनेश्वरी मात्र दोघांना विभक्त करण्याच्या तयारीत, काय होईल परिणाम

सोशल मीडियावर राज व त्याची बायको नेहमीच सक्रिय असतात. राजने ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर केलं. त्यानंतर तो ‘जीवाची होतीया काहूली’ या मालिकेतही महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसला. यानंतर आता राजची ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेतील भूमिका साऱ्यांच्या पसंतीस पडत आहे. राजच्या सागर या पात्रावर प्रेक्षक भरभरुन प्रेम करताना दिसत आहेत.

Tags: entertainmentmarathi actorpremachi goshtaraj hanchanaleRaj Hanchanale Wife
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Paaru Serial Update

पारू-आदित्यची अनोखी डेट, दामिनी देवी किर्लोस्कर दोघांना शोधू शकतील का?, अहिल्यादेवींचीही काळजी वाढली

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.