मालिकांच्या टीआरपीमध्ये सध्या ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका अव्वल स्थानावर असलेली पाहायला मिळत आहे. मालिका सुरु झाली तेव्हापासून या मालिकेवर प्रेक्षक भरभरुन प्रेम करताना दिसत आहेत. या मालिकेत यामध्ये तेजश्री प्रधान, राज हंसनाळे, अपूर्वा नेमळेकर यांच्या व्यतिरिक्त शुभांगी गोखले, संजीवनी जाधव ही कलाकार मंडळी महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसत आहेत. मालिकेतील तेजश्री व राज म्हणजेच मुक्ता व सागर या जोडीवर तर प्रेक्षक भरभरुन प्रेम करताना दिसत आहेत. (Apurva Nemlekar On Tejashri pradhan)
मालिकेत सागर व मुक्ता यांचं एकमेकांवरील प्रेम वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र सावनी म्हणजेच सागरची पहिली पत्नी या सागरच्या वैयक्तिक नात्यात काही ना काही अडथळे आणताना दिसत आहे. सावनीला सागर व मुक्ता एकत्र आलेले नको आहेत यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करताना दिसत आहे. मात्र मुक्ताच्या पाठी सागर खंबीरपणे उभा असतो आणि तितकीच सागरला मुक्ताचीही साथ असते. पडद्यावर हे वादळासारखं असलेलं नातं मात्र पडद्यामागे शांत, निखळ असल्याचं समोर आलं आहे.

नुकताच तेजश्री प्रधानचा वाढदिवस झाला. यानिमित्त अपूर्वाने खास व्हिडीओ शेअर करत तेजश्रीला शुभेच्छा दिल्या आहेत. पडद्यावर त्यांच्यात कितीही वाद झाले असले तरी पडद्यामागे त्यांची मैत्रीही खूप निखळ आहे. तेजश्रीसाठी अपूर्वाने पोस्ट शेअर करत असं म्हटलं आहे की, “”मी ज्या व्यक्तीशी पडद्यावर सर्वात जास्त भांडते तिच व्यक्ती जी माझ्या खऱ्या आयुष्यात माझी पाठराखीण आहे. असा आधार देणारी आणि काळजी घेणारी मैत्रीण असल्याबद्दल धन्यवाद. जेव्हा जेव्हा मला तुझी गरज असते तेव्हा माझ्यासाठी उपस्थित राहिल्याबद्दल धन्यवाद. तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. मी तुझ्याबरोबर पडद्यावर भांडण्यासाठी येणाऱ्या अनेक भागांची आतुरतेने वाट पाहेन. आणि पडद्यामागची माझी-तुझी मैत्री ही कायम खास असेल”.
या मालिकेतून अभिनेत्री तेजश्री प्रधानने जवळपास दोन वर्षांच्या ब्रेकनंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. यापूर्वी तिच्या ‘अग्गं बाई सासूबाई’, ‘होणार सून मी या घरची’ या मालिकांना प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला होता. आता ‘प्रेमाची गोष्ट’ या नव्या मालिकेच्या माध्यमातून तेजश्री पुन्हा एकदा छोटा पडदा गाजवताना दिसत आहे.