बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेरावच्या लेकाची स्वयंपाकघरात भलतीच करामत, आजीपासून लपवून चिमुकल्याने काय केलं पाहा

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
नोव्हेंबर 8, 2023 | 10:45 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Namrata Sambherao share a funny video of her son Rudraaj

Video : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम नम्रता संभेरावच्या लेकाची स्वयंपाकघरात भलतीच करामत, आजीपासून लपवून चिमुकल्याने काय केलं पाहा

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमाचे आज जगभरात मोठा चाहतावर्ग आहे. तुफान विनोदी स्किट्सचे सर्वच जण दिवाने झाले. शिवाय, कलाकारांच्या अफलातून टायमिंगचं देखील कार्यक्रमाच्या लोकप्रियतेमागे मोठं योगदान आहे. या कार्यक्रमातून अनेक कलाकार घराघरात पोहोचले असून त्या प्रत्येक कलाकाराचा एक चाहतावर्ग निर्माण झाला. नाटक, मालिका व चित्रपटांमधून झळकलेली अभिनेत्री नम्रता संभेरावलाही या कार्यक्रमातून मोठी लोकप्रियता मिळाली आहे. नम्रताने या कार्यक्रमात अनेक व्यक्तिरेखा साकारली असून तिच्या सर्वच व्यक्तिरेखांना प्रेक्षकांकडून शाबासकीची थाप मिळाली. (Namrata Sambherao share a funny video of her son Rudraaj)

अभिनयाव्यतिरिक्त नम्रता सोशल मीडियावर जोरदार सक्रिय असून ती नेहमीच तिच्या चाहत्यांसह विविध फोटोज व व्हिडीओज शेअर करत असते. नम्रता तिचा लेक रुद्राजचे अनेक व्हिडीओ शेअर करते, ज्याची नेहमी चर्चा होत असते. आताही तिने तिच्या लेकाचा शेअर केलेला एक छानसा व्हिडीओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये रुद्राज व नम्रता यांच्यात गोड संभाषण होताना दिसत आहे. रुद्राज या व्हिडीओत त्याच्या आजीपासून लपवून स्वयंपाक घरात जाऊन त्याच्या ज्यूस पिताना दिसत आहे. तर त्याची आई नम्रता त्याला आजी ओरडणार असल्याचं सांगते. ती रुद्राजला विचारते, “काय केलंस तू रुद्राज?”. त्यावर तो म्हणाला, “मी हा ज्यूस घेतला, तिकडे ठेवला आणि ओतला.” त्यावर आई (नम्रता) म्हणाली, “अरे पण आजी ओरडेल ना?”. त्यावर तो म्हणाला, “नाही ना, थांब मी दाखवतो.”

हे देखील वाचा – फेसबुक, इन्स्टाग्रामवरुन प्रेक्षकांनी केली आर्थिक मदत, ‘त्या’ व्हिडीओनंतर जुई गडकरीचं होतंय कौतुक, आश्रमात गेली अन्…

View this post on Instagram

A post shared by Namrata Yogesh Sambherao (@namrata_rudraaj)

पुढे रुद्राज आईला (नम्रता) सांगतो, “आता बघा माझी ऍक्टिंग… माझी ऍक्टिंग बघा हा आता.” त्यावर ती म्हणते, “अरे रुद्राज आजीला कळेल ना की, त्याच्यात ज्यूस आहे.”. त्यावर तो म्हणाला, “नाही कळणार. कारण माझ्याकडे एक आयडिया आहे.” असं म्हणत त्याने ही आयडिया आईला सांगितली. “आजीला हे पण माहित नाही की, मी आणलं हे ज्यूस आणि त्यात मी पाणी टाकलं.”, असं तो यामध्ये म्हणाला. त्यावर ती म्हणाली, “असं बोलला तू आजीला?” त्यावर तो हो बोलला आणि माझ्या आजीला हेही माहित नसल्याचं सांगितला. त्यावर नम्रता रुद्राजला ही आयडिया कशी सुचली असल्याचं विचारता तो म्हणाला, “ही माझी सोप्पी आयडिया आहे.”

हे देखील वाचा – “दुसऱ्या देशात जा”, दिवाळीमध्ये फटाके न फोडण्याचा सल्ला दिल्यानंतर वैभव मांगले ट्रोल, नेटकरी म्हणाले, “कलाकार आहात म्हणून…”

पुढे ती रूद्राजला सांगते, “तुझी ही आयडिया फ्लॉप आहे.” त्यावर तो म्हणतो, “नाही, तुझी रेकॉर्डिंग फ्लॉप आहे.” त्यावर प्रतिप्रश्न करत ती म्हणते, “कोण बोललं असं?” त्यावर तो लगेच म्हणाला, “तूच बोलली स्वतःच्या हाताने.” त्यावर “माझ्या स्वतःच्या हाताने बोललीस. असं हाताने कोण बोलतं का?” असं नम्रता रुद्राजला म्हणाली आणि हे माय-लेक हसताना दिसतात. या गोंडस व्हिडीओला तिने “रुद्राज म्हणतोय माझी ऍक्टिंग बघा, मी शूट केलं तर म्हणतोय आई तुझी रेकॉर्डिंग फ्लॉप आहे.”, असं कॅप्शन दिलं आहे. माय-लेकाचा हा गोंडस व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. तसेच, कलाकारांसह चाहत्यांनीही रुद्राजच्या या निरागसपणाचे कौतुक केले आहे.

Tags: instagram videomaharashtrachi hasya jatranamrata sambheraoNamrata Sambherao share a funny video of her son Rudraajrudraaj sambherao
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

Rakhi Sawant Interview
Entertainment

वडिलांचा विरोध, छोटे कपडे घालून आयटम साँग आणि…; Dramaqueen राखी सावंतचा स्ट्रगल, म्हणाली, “कोणाचा बाप बसलाय…”

एप्रिल 15, 2026 | 1:26 pm
Bobby Deol alcohol quit
Entertainment

“कुटुंबातील सदस्य घाबरले”, दीड वर्षांपासून दारूपासून दूर राहिलाय बॉलिवूड अभिनेता, लवकर थकायचा आणि…

एप्रिल 15, 2026 | 11:49 am
rakhi sawant desinger dress
Entertainment

‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी १२ लाखाचा ड्रेस, राखी सावंतची जय्यत तयारी, दुबईला जाऊन…

एप्रिल 15, 2026 | 11:08 am
Salman Khan Skipped Asha Bhosle Funeral
Entertainment

Asha Bhosle Funeral : मुंबईत असूनही आशा भोसलेंच्या अंत्यसंस्काराला शाहरुख आणि सलमान खान का आले नाहीत?, कारण समोर…

एप्रिल 15, 2026 | 9:47 am
Next Post
Amruta Deshmukh Kelvan Special Ukhana

भावाने केलेल्या केळवणात बहीण अमृता देशमुखने काय उखाणा घेतला पाहा, म्हणाली, "अभिषेक व कृतिकाने काँटिनेंटल केळवण करून…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.