Premachi Goshta 2 movie trailer : अभिनेता ललित प्रभाकर अभिनीत ‘प्रेमाची गोष्ट २’ चित्रपटाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे. हा चित्रपट येत्या काही दिवसांत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटातील टिझर आणि गाणी आधीच चर्चेत आली आणि नुकताच प्रदर्शित झालेला ट्रेलर पाहिल्यानंतर प्रेक्षकांची उत्सुकता आणखीच वाढली गेली. या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा अगदी दिमाखात पार पडला. या धमाल सोहळ्यात ललित प्रभाकर, ऋचा वैद्य आणि रिधिमा पंडित यांनी चित्रपटातील ‘ओल्या सांजवेळी २.०’ व ‘ये ना पुन्हा’ या गाण्यांवर सुंदर नृत्य सादर केले.
ट्रेलरमध्ये ललितच्या आयुष्यात आलेली वळणं ठळकपणे दिसत आहेत. लग्न, घटस्फोट आणि त्यानंतर पुन्हा समोर आलेलं जुनं प्रेम. या सगळ्यामुळे त्याचं आयुष्य जणू एका वादळात सापडलं आहे. स्वतःच्या चुकांचा आणि नशिबाचा हिशोब करताना तो सगळ्याचा दोष देवाला देताना दिसत आहे. परंतु देव त्याला खरंच नशिब बदलण्याची दुसरी संधी देणार का? आणि दिलीच, तरी ललितचं नशिब खरंच बदलेल का? याचं उत्तर प्रेक्षकांना चित्रपट पाहूनच मिळणार आहे.
आणखी वाचा – वयाच्या ४१ व्या वर्षी दुसऱ्यांदा गरोदर आहे भारती सिंग, बेबी बंप फ्लॉन्ट करत दिली गुडन्यूज, म्हणाली…
चित्रपटात आजच्या काळातील प्रेमाचे वास्तव, त्यातील बदलती नाती, डिजिटल युगातील संवादाचे रूप आणि व्हीएफएक्स यांचा सुंदर मिलाफ आहे. आधुनिक तंत्रज्ञान, भावनांनी भरलेली कथा आणि सतीश राजवाडेंची खास प्रेमकथेची मांडणी या सगळ्यांचा अनोखा संगम ‘प्रेमाची गोष्ट २’च्या ट्रेलरमधून दिसत आहे.
आणखी वाचा – साखरपुड्याच्या तीन दिवसांनी सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या गाडीचा अपघात, तब्येतीबाबत मोठी अपडेट समोर
एव्हरेस्ट एंटरटेनमेंटचे निर्माते संजय छाब्रिया आणि सह-निर्माते अमित भानुशाली यांचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प असून, दिग्दर्शनाची जबाबदारी सतीश राजवाडे यांनी सांभाळली आहे. या चित्रपटात ललित प्रभाकर, ऋचा वैद्य, रिधिमा पंडित, स्वप्निल जोशी, भाऊ कदम यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘प्रेम आणि नशिबाचा हा जादुई प्रवास’ प्रेक्षकांना २१ ऑक्टोबर म्हणजेच दिवाळीच्या शुभमुहूर्तावर अनुभवायला मिळणार आहे.





