कलाकारांच्या कामामुळे प्रेक्षक कायमच त्यांच्यावर भरभरून प्रेम करतात. त्यांच्या कामाचं कौतुक करतात. पडद्यावर एकत्र दिसणाऱ्या जोड्यांची केमीस्ट्री प्रेक्षकांना जितकी आवडते. तितकीच खऱ्या आयुष्यात कलाकारांचे जोडीदार कोण आहेत. त्यांचं बॉण्डिंग हे जाणून घेण्यासाठी देखील प्रेक्षक तितकेच उत्सुक असतात.जे कलाकार एकमेकांना डेट करत आहेत अशी शंका प्रेक्षकांना असते आणि तेच कलाकार जेव्हा स्वतः त्या प्रेमाची कबुली देतात. तेव्हा प्रेक्षकांना हे कलाकार आपल्या कुटुंबाचा भाग असल्या सारखा आनंद होतो.(Prathamesh Laghate First Kelvan)
सारेगमप लिटिल चॅम्प्स या शोने प्रेक्षकांचं मन जिंकलं.या शोमुळे रोहित राऊत,कार्तिकी गायकवाड,आर्या आंबेकर,मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे ही पंच रत्न सिनेसृष्टीला मिळाली.यातील दोघे तर लग्नबंधनात अडकले. त्यांच्यातील सध्या प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंमपायन कलाकार जोडप्याने आमचं ठरलंय असं म्हणत आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे.सारेगमप नंतरही ही कलाकार बरयाचदा एकत्र दिसले आहेत.प्रथमेश आणि मुग्धाने अनेक कार्यक्रम एकत्र केले आहेत.ते दोघे एकमेकांना डेट करत असतील अशी शंका प्रेक्षकांना होतीच. परंतु त्यांचा या कबुलीने प्रेक्षकांना आता त्यांच्या लग्नाची उत्सुकता आहे.
प्रथमेश लघाटेच्या पहिल्या केळवणाचा थाट (Prathamesh Laghate First Kelvan)
लग्न म्हंटल की एक सोहळाच असतो. आणि कलाकारांचं लग्न म्हंटल की प्रेक्षक देखील तितकेच उत्सुक असतात.सोशल मीडियाच्या माध्यमातून ते कलाकारांवर शुभेच्छांचा वर्षाव करतात.लग्नामध्ये केळवण या पद्धतीला देखील फार महत्व आहे. नुकतंच प्रथमेशचं पाहिलं केळवण पार पडलं. या केळवणाचा व्हिडिओ प्रथमेशने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर केला आहे.
या व्हिडिओच्या कॅप्शन मध्ये प्रथमेशने म्हंटल आहे,’आमचं ठरलंय’ च्या घोषणेनंतर आता हळू हळू केळवणांना सुरुवात होतेय! हे फिलिंग खूप भारी आहे.अतिशय पारंपारिक पद्धतीने, प्रचंड आपुलकीने,पंच पकवनांच्या जेवणाने,अतिशय आग्रहाने खाऊ घालून माझ्या केळवनांचा शुभारंभ ‘चतुरंग’ ने केल्याबद्दल पूर्ण टीम ला खूप धन्यवाद मिस यु मुग्धा.तसेच प्रथमेशने या केळवणात वाढलेलं पान रिकामं केलं, ‘एक एक घास घेत घेत चतुरंगाच्या कार्यालयामध्ये फक्कड जमलं माझ्या केळवणाचा बेत’ हा खास उखाणा देखील घेतला.(Prathamesh Laghate First Kelvan)
हे देखील वाचा : जुईची तारेवरची कसरत-असं असतं डेली रुटीन