शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Prathamesh Parab Kshitija Ghosalkar Wedding : प्रथमेश परबच्या बायकोच मंगळसूत्र आहे खूपच खास, सोशल मीडियावर रंगली चर्चा, डिझाइनने वेधलं लक्ष

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 24, 2024 | 6:21 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Prathamesh Parab wife Kshitija Ghosalkars attractive mangalsutra grabbed attention

प्रथमेश परबच्या बायकोच मंगळसूत्र आहे खूपच खास, सोशल मीडियावर रंगली चर्चा, डिझाइनने वेधलं लक्ष

Prathamesh Parab Kshitija Ghosalkar Marriage : ‘टाइमपास’ चित्रपटातून खरं प्रेम करायला शिकवणारा दगडू म्हणजेच अभिनेता प्रथमेश परब नुकताच विवाहबंधनात अडकला आहे. प्रथमेशला त्याच्या आयुष्यातील पराजू मिळाली आहे. म्हणजेच प्रथमेश नुकताच गर्लफ्रेंड क्षितिजा घोसाळकरबरोबर विवाहबंधनात अडकला आहे. गेले काही दिवस प्रथमेश-क्षितिजा यांच्या लग्नाची बरीच चर्चा रंगली होती आणि शेवटी हे दोघे विवाहबंधनात अडकले आहेत. जवळचे नातेवाईक व कुटुंबियांच्या उपस्थितीत प्रथमेश-क्षितिजा यांचा विवाहसोहळा संपन्न झाला आहे. प्रथमेश-क्षितिजा यांच्या लग्नाचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

प्रथमेशने त्याच्या लग्नासाठी सफेद रंगाचा कुर्ता, त्यावर गुलाबी रंगाचं पीतांबर अन् मराठमोळा फेटा असा लूक केला होता. तर प्रथमेशच्या बायकोने लग्नसाठी गुलाबी रंगाचा भरजरी काठ असलेली पिवळ्या रंगाची नऊवारी साडी परिधान केली होती आणि त्यावर डिझाइनर असा ब्लाऊज परिधान केला होता. तसेच तिने घातलेल्या मोत्यांच्या दागिन्यांमुळे क्षितिजा खूपच सुंदर दिसत होती.

आणखी वाचा – प्रथमेश परब व क्षितिजा घोसाळकरचा विवाहसोहळा संपन्न, मराठमोळ्या पद्धतीने पार पडलं लग्न, साधेपणाने वेधलं लक्ष

प्रथमेश-क्षितिजा यांच्या या हटके लूकसह क्षितिजाच्या मंगळसूत्रानेदेखील चाहत्यांचे चांगलेच लक्ष वेधून घेतले आहे. क्षितिजाच्या मॉडर्न डिझाईन असलेल्या मंगळसूत्रात काळ्या मण्यांनादेखील तितकेच महत्त्वाचे स्थान दिले असल्याचे पाहायला मिळत आहे. क्षितिजाचे मंगळसूत्र हे मॉडर्न असले तरी त्याला पारंपरिकतेचादेखील तितकाच साज आहे. त्यामुळे क्षितिजाचे पारंपरिक तरीही मॉडर्न डिझाईन असलेलं मंगळसूत्र अनेकांना आवडले असल्याचे म्हटले आहे.

आणखी वाचा – लग्न लागताच बायकोच्या पाया पडला प्रथमेश परब, पत्नीनेही नमस्कार केला अन्…; व्हिडीओ तुफान व्हायरल

दरम्यान, प्रथमेश-क्षितिजा यांनी “Lockdown love story चे Hearts, forever साठी locked” असं म्हणत त्यांच्या लग्नाचे हे खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. प्रथमेश-क्षितिजा यांच्या या फोटोला लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. तसेच चाहत्यांसह अनेक कलाकार मंडळींनी प्रथमेश-क्षितिजा यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

Tags: kshitija ghosalkarPrathamesh Parab Kshitija Ghosalkar MarriagePrathamesh Parab Kshitija Ghosalkar Wedding DatePrathamesh Parab Kshitija Ghosalkar Wedding Latest Marathi NewsPrathamesh Parab Kshitija Ghosalkar Wedding Marathi NewsPrathamesh Parab Kshitija Ghosalkar Wedding PhotosPrathamesh Parab Marriage Newsprathamesh parab weddingPrathamesh Parab Wedding Marathi Newsक्षितीजा घोसाळकरप्रथमेश परब क्षितीजा घोसाळकर फोटोप्रथमेश परब क्षितीजा घोसाळकर लग्नप्रथमेश परब क्षितीजा घोसाळकर विवाह मराठी बातम्याप्रथमेश परब लग्नप्रथमेश परब लग्नाच्या बातम्याप्रथमेश परब विवाह
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
Rahul Vaidya And Disha Parmar

Video : राहुल वैद्यने जपली मराठी संस्कृती, लेकीला महालक्ष्मीच्या चरणी घेऊन गेला अन्…; चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.