गुरूवार, एप्रिल 16, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Prathamesh Parab Kshitija Ghosalkar Wedding : लग्न लागताच बायकोच्या पाया पडला प्रथमेश परब, पत्नीनेही नमस्कार केला अन्…; व्हिडीओ तुफान व्हायरल

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
फेब्रुवारी 24, 2024 | 3:36 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Prathamesh Parab Kshitija Ghosalkar Wedding Marathi News

प्रथमेश परब क्षितीजा घोसाळकर विवाह सोहळा

Prathamesh Parab Kshitija Ghosalkar Marriage : सिनेसृष्टीत सध्या लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळत आहे. अशातच अभिनेता प्रथमेश परबचा शाही विवाहसोहळा संपन्न झाला आहे. प्रथमेश परबने त्याची गर्लफ्रेंड क्षितिजा घोसाळकरसह लगीनगाठ बांधली आहे. बरीच वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर अखेर ही जोडी लग्नबंधनात अडकली आहे. दोघांच्या विवाहसोहळ्याचे फोटो, व्हिडीओ समोर आले असून यांत नववधूवरांच्या लूकने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. कोणताही अवाढव्य खर्च न करता अत्यंत साधेपणाने त्यांनी विवाहसोहळा उरकला असल्याचं दिसत आहे.

गेल्या काही दिवसांपासून प्रथमेश परबच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु असलेली पाहायला मिळत होती. अशातच अखेर आता प्रथमेश लग्नबंधनात अडकला आहे. प्रथमेश व क्षितिजाच्या लग्नसोहळ्यातील खास मराठमोळ्या लूकने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. प्रथमेशने लग्नासाठी खास पारंपरिक असा पांढऱ्या रंगाचा कुर्ता व गुलाबी रंगाचं धोतर परिधान केलं होतं. तर क्षितिजाने पिवळ्या रंगाची नऊवारी साडी परिधान केली होती. इतकंच नव्हे तर क्षितिजाने घातलेल्या मोत्यांच्या दागिन्यांनी नवऱ्या मुलीचं लूक खुलून आलं होतं.

आणखी वाचा – प्रथमेश परब व क्षितिजा घोसाळकरचा विवाहसोहळा संपन्न, मराठमोळ्या पद्धतीने पार पडलं लग्न, साधेपणाने वेधलं लक्ष

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

प्रथमेश व क्षितिजा यांचा वरमाला घालतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमधील दोघांच्या एका कृतीने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. लग्न लागताच प्रथमेश त्याच्या बायकोच्या पाया पडला. तर क्षितिजानेही प्रथमेशच्या पाया पडत आशीर्वाद घेतले. सध्या दोघांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून चाहत्यांनी दोघांच्या संस्काराचे कौतुक केलेलं पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – “रोज कितीतरी माणसं मरत असतात…”, भर कार्यक्रमात आस्ताद काळेने सादर केलेली वास्तववादी कविता मनाला स्पर्श करुन गेली अन्…

अत्यंत साधेपणाने व मराठमोळ्या पद्धतीने प्रेक्षकांच्या या लाडक्या जोडीचा विवाहसोहळा पार पडला आहे. दोघांच्या लग्नाला जवळचे नातेवाईक व कुटुंबीय उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं. याआधीही प्रथमेशच्या हळदी समारंभाच्या फोटोंची चर्चा रंगली होती. त्यांच्या हळदी समारंभालाही साऱ्यांनी धमाल करत डान्स केलेला पाहायला मिळाला. तसेच प्रथमेशच्या बायकोचे हळदी व मेहंदीचे फोटोही चर्चेत राहिले.

Tags: entertainmentmarathi actorPrathamesh Parab Kshitija GhosalkarPrathamesh Parab Kshitija Ghosalkar MarriagePrathamesh Parab Kshitija Ghosalkar wedding
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Rakhi Sawant and Raqesh Bapat bonding
Entertainment

“मला माझा संसार हवाय”, राकेश बापटच्या एकतर्फी प्रेमात आहे राखी, म्हणाली, “मी बॉलिवूड सोडेन”

एप्रिल 15, 2026 | 4:38 pm
Rakhi Sawant Interview
Entertainment

वडिलांचा विरोध, छोटे कपडे घालून आयटम साँग आणि…; Dramaqueen राखी सावंतचा स्ट्रगल, म्हणाली, “कोणाचा बाप बसलाय…”

एप्रिल 15, 2026 | 1:26 pm
Bobby Deol alcohol quit
Entertainment

“कुटुंबातील सदस्य घाबरले”, दीड वर्षांपासून दारूपासून दूर राहिलाय बॉलिवूड अभिनेता, लवकर थकायचा आणि…

एप्रिल 15, 2026 | 11:49 am
rakhi sawant desinger dress
Entertainment

‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी १२ लाखाचा ड्रेस, राखी सावंतची जय्यत तयारी, दुबईला जाऊन…

एप्रिल 15, 2026 | 11:08 am
Next Post
Prathamesh Parab Kshitija Ghosalkar Wedding Marathi News

Prathamesh Parab Kshitija Ghosalkar Wedding : बाशिंग, पारंपरिक दागिने अन् मराठमोळा पेहराव; प्रथमेश परब-क्षितिजा घोसाळकरच्या लग्नाचा लूक ठरतोय लक्षवेधी

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.