दरवर्षी ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमा तिथीला वटपौर्णिमेचे व्रत केले जाते. पतीला दीर्घायुष्य लाभावे आणि वैवाहिक जीवन सुखी व्हावे; यासाठी महिलावर्ग वटपौर्णिमेचा उपवास करतात. वटपौर्णिमा हा आपल्या भारतीय संस्कृतीतील एक महत्वाचा सण मानला जातो. या दिवशी महिलांनी वटवृक्षाची पूजा केल्यास नवऱ्याची आयु वाढते, असे मानले जाते. त्यामुळे आजच्या दिवशी महिला आपल्या नवऱ्याच्या दीर्घायूष्यासाठी व्रत करतात.
यंदा मराठी सिनेसृष्टी व टेलिव्हिजनवरील अनेक जण विवाहबंधनात अडकले. त्यामुळे यावर्षी बऱ्या सेलिब्रेटींचा पहिला वटपौर्णिमेचा सण आहे. अनेक मराठी कलाकार आज पहिल्यांदाच त्यांची वटपौर्णिमा साजरी करणार आहेत. मुग्धा-प्रथमेश, गौतमी-स्वानंद, शिवानी-अजिंक्य, तितीक्षा-सिद्धार्थ आदी कलाकारांसह ‘टाईमपास’ फेम अभिनेता प्रथमेश परब हादेखील विवाहबंधनात अडकला. त्यामुळे प्रथमेश व त्याची पत्नी क्षितिजा यांच्यासाठीही यंदाचा वटपौर्णिमेचा सण विशेष असणार आहे.

आणखी वाचा – अनुपम खेर यांच्या ऑफिसमध्ये चोरी, रोख रक्कमेसह काही वस्तू लंपास, अभिनेत्याने व्हिडीओद्वारे दाखवलं सत्य
आजच्या या वटपौर्णिमेच्या खास सणानिमित्त प्रथमेशची बायको क्षितिजाने सोशल मीडियावर खास फोटो शेअर केला आहे. क्षितिजाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे खास फोटो शेअर करत “पहिली वटपौर्णिमा” असंही म्हटलं आहे. पहिल्या वटपौर्णिमेनिमित्त क्षितिजा तिच्या माहेरी म्हणजेच श्रीवर्धन येथे गेले असून तिच्यासह तिचा नवरा म्हणजेच प्रथमेश परबही गेला आहे. आजच्या या खास क्षणासाठी तिने गुलाबी रंगाची साडी परिधान केली असल्याचे या फोटोमध्ये दिसत आहे. तसेच पूजेच्या ताटाचा खास फोटोही तिने शेअर केला आहे.
प्रथमेशनेही त्याच्या बायकोचा वडाच्या झाडाला फेऱ्या मारतानाचा खास व्हिडीओ शेअर केला आहे. “क्युट बायको” असं म्हणत तिने हा खास व्हिडीओ शेअर केला आहे. दरम्यान, दरम्यान, २४ फेब्रुवारी रोजी प्रथमेश व क्षितिजा यांचा शाही विवाहसोहळा संपन्न झाला. अगदी थाटामाटात व पारंपरिक अंदाजात दोघांनी लग्नगाठ बांधलेली पाहायला मिळाली. दोघे त्यांच्यातील क्षणांचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. अशातच प्रथमेश-क्षितिजा या दोघांनी त्यांच्या पहिल्या वटपौर्णिमेचे काही खास क्षण शेअर केले आहेत.