आज समस्त महिलावर्ग वटपौर्णिमा पूजा करताना दिसत आहेत. यांमध्ये आता नवोदित लग्न झालेल्या महिलांची पहिलीच वटपौर्णिमा आहे. आणि ही वटपौर्णिमा या महिला अगदी थाटामाटात साजरी करत आहेत. अशातच काही नव्या लग्न झालेल्या अभिनेत्रींचीही यंदा पहिलीच वटपौर्णिमा आहे. गेल्या वर्षभरात अनेक कलाकार जोड्या या लग्नबंधनात अडकल्या. यांमध्ये अभिनेत्री पूजा सावंत हिचेही नाव आहे. पूजाची यंदा पहिली वटपौर्णिमा असून तिने ही वटपौर्णिमा अगदी थाटामाटात साजरी केली असल्याचं पाहायला मिळत आहे. (Pooja sawant vatpornima)
नुकतेच पूजाच्या या वटपौर्णिमेचे फोटो तिने व तिची बहीण रुचिरा हिने इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केले आहेत. पहिली वटपौर्णिमा असं कॅप्शन देत तिने साज शृंगाराचा फोटो पूजाने शेअर केला आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये पूजाने तिच्या ताटात वाण असलेला फोटो पोस्ट केला आहे आणि या फोटोला वटपौर्णिमा असं कॅप्शन देत हा फोटो तिचा नवरा सिद्धेशला टॅगही केला आहे. तर पूजाची बहीण रुचिरा हिनेही ‘बहिणीची पहिली वटपौर्णिमा’ असं कॅप्शन देत पोस्ट शेअर केली आहे.
वटपौर्णिमेला पूजाने खास पारंपरिक लूक केला होता. भरजरी आणि काठापदराच्या पिवळ्या रंगाच्या साडीमध्ये पूजा खूपच सुंदर दिसत होती. मोजकेच दागिने परिधान करत तिने केलेला शृंगारही लक्ष वेधून घेत आहे. नाकात नथ, गळ्यात मोत्याचा हार आणि हिरवा चुडा करत पूजाने खास लूक केला होता. लग्नानंतरची पहिली वटपौर्णिमा पूजाने अगदी उत्साहात साजरी केली आहे. ‘आज मी तुला खूप मिस करत आहे’, असं कॅप्शन देत पूजाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन पोस्टही शेअर केली आहे.
२८ फेब्रुवारी रोजी पूजाने सिद्धेश चव्हाणसह लग्नगाठ बांधली. पूजाच्या संगीत, हळदी तसेच लग्नाआधीच्या काही विधींचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले पाहायला मिळाले. या फोटो व व्हिडीओना चाहत्यांकडूनही चांगलाच प्रतिसाद मिळाला. पूजाचा नवरा कामासाठी ऑस्ट्रेलिया येथे असून सध्या तो लग्नासाठी भारतात परतला आहे. पूजाचा नवरा हा मूळचा मुंबईचा असून त्यांचं अरेंज मॅरेज आहे.