‘बालक पालक’, ‘टाइमपास’, ‘उर्फी’, ‘टकाटक’ यांसारख्या चित्रपटातून घराघरांत पोहोचलेला अभिनेता प्रथमेश परब काही दिवसांपूर्वी लग्नाच्या बेडीत अडकला. २४ फेब्रुवारीला प्रथमेशने प्रियसी क्षितिजा घोसाळकरबरोबर लग्नगाठ बांधली. लग्नापासून प्रथमेश व क्षितिजा ही जोडी सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. अनेक चित्रपटांमधून प्रथमेश नेहमीच प्रेक्षकांच्या भेटीस येत असतो. चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारा हा अभिनेता सोशल मीडियावरही तितकाच सक्रीय असतो. सोशल मीडियावर तो क्षितिजाबरोबरचे व त्याचे आपले अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. त्याच्या या फोटो व व्हिडीओला चाहत्यांकडूनही कायम प्रतिसाद मिळत असतो.
प्रथमेश व क्षितिजा सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतात. ते नेहमीच सोशल मीडियावर काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. अशातच हे दोघे नुकतेच त्यांच्या लग्नाला पाच महीने पूर्ण झाल्यानिमित्त फिरायला गेले होते आणि एक खास व्हिडीओद्वारे त्यांनी याची खास झलक दाखवली आहे. प्रथमेश-क्षितिजा यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे याचा व्हिडीओ शेअर केला आहे. मात्र यावेळी ते मुंबई-पुणेऐवजी नगर येथे या खास सेलिब्रेशनसाठी गेले होते.
आणखी वाचा – सर्वार्थ सिद्धी योगामुळे रविवारचा दिवस यशस्वी जाणार, मेष, वृषभ राशीच्या संपत्तीत होणार वाढ, जाणून घ्या…
प्रथमेशने त्याच्या या लाग्नाच्या पाच महिन्याच्या सेलिब्रेशनचा खास व्हिडीओ शेअर करत असं म्हटलं आहे की, “अॅनिव्हर्सरी (anniversary तर वर्षातून एकदाच असते ना, मग हे काय महिन्याला सेलिब्रेशन सुरू आहे?? मान्य आहे anniversary वर्षातुन एकदाच असते पण आम्ही आमच्या आयुष्यातील हा गोड दिवस दर महिन्याला जसा जमेल तसा साजरा करण्याचा प्रयत्न करतो. कधी चित्रपट बघायला जाणे, कधी घरीच बायकोच्या हातचं खास जेवण, कधी नॉनस्टॉप गप्पा. जसं जमेल तसं, पण तो दिवस आम्ही मनापासुन साजरा करतो. यावेळेस पाच महिने पूर्ण झाल्यावर, क्षितिजासाठी हे एक छोटंसं सरप्राइजच मी आयोजन केलं”.
यापुढे तो असं म्हणाला की, “नगर येथील अरण्यगिरी रिसॉर्टमध्ये. कमाल आहे हा रिसॉर्ट. नावाप्रमाणेच तो अरण्यात आहे. निसर्गाच्या सानिध्यात, राजहंस, बदक, घोडे, वेगवेळ्या पद्धतीच्या खोल्या, आपली वाटणारी जागा, आणि मुळात शहरापासून दूर आणि रोजच्या धकाधकीच्या जीवनात हवी असते ती ‘शांतता’. त्या जागेत एक वेगळीच जादू आहे. विश्वास ठेवा, तिथून परत यावसंच वाटत नव्हतं. एखादया माणसाला आपल्या प्रेमात पाडणाऱ्या खूप कमी जागा असतात, यापुढे आमच्यासाठी अरण्यगिरी, ही त्यापैकीच एक जागा असेल”.
दरम्यान, या व्हिडीओमध्ये प्रथमेश व क्षितिजा यांनी तिथे अनुभवलेल्या खास क्षणांची झलकही पाहायला मिळत आहे. यावेळी त्यांनी केक कट करत तिथे लग्नाच्या पाच महिन्यांच्या पूर्ततेनिमित्त सेलिब्रेशन केलं. त्याचबरोबर त्या रिसॉर्टमधील प्रत्येक ठिकाणाचा व खेळांचा मनमुराद आनंद लुटल्याचेही या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.