मंगळवार, एप्रिल 21, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“त्याने पॅंटची चैन उघडली आणि…”, दिल्लीमध्ये प्रवास करताना सुप्रसिद्ध अभिनेत्रीला घाणेरडा अनुभव, म्हणाली, “माझा हात पकडून…”

Majja Webdeskby Majja Webdesk
जुलै 27, 2024 | 7:39 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
tillotama shome incidence

"त्याने पॅंटची चैन उघडली आणि...", दिल्लीमध्ये प्रवास करताना सुप्रसिद्ध अभिनेत्रीला घाणेरडा अनुभव, म्हणाली, "माझा हात पकडून..."

‘सर’ या चित्रपटामधून अभिनेत्री तिलोत्तमा शोम ही अधिक प्रकाशझोतात आली. यामधील तिलोत्तमाच्या अभिनयाचे मोठ्या प्रमाणात कौतुक झालं. याचप्रमाणे ती अनेक चित्रपट व वेबसीरिजमध्येही काम करताना दिसून आली होती. सध्या ‘त्रिभुवन मिश्रा सीए टॉपर’ ही वेबसीरिज ओटीटी प्लॅटफॉर्मवर आली असून याच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असलेली दिसून येत आहे. यादरम्यान तिची एक मुलाखत अधिक चर्चेत राहिली आहे. या मुलाखतीमध्ये तिने आपल्या खासगी आयुष्यातील अनेक प्रसंग शेअर केले आहेत. हे प्रसंग ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला आहे. (tillotama shome incidence)

तिलोत्तमाने दिलेल्या मुलाखतीमध्ये तिच्याबरोबर घडलेल्या वाईट प्रसंगाबद्दल सांगितले आहे. तसेच या मुलाखतीमध्ये लैंगिक शिक्षणावरही भाष्य केले आहे. ‘हॉटर फ्लाय मेल फेमिनिस्ट’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने तिच्या आयुष्याबद्दल अनेक खुलसे केले आहेत. तसेच आई-वडिलांना अनेक प्रश्नदेखील विचारण्याची सवय होती असेही तिने सांगितले आहे. ती आई-वडिलांना मुलं कशी जन्माला येतात?, सेक्स कसा केला जातो? असे प्रश्न विचारत असत तसेच तिचे पालकही सर्व उत्तर देत असत.

आणखी वाचा -कंगना रणौतची Paris Olympics वर सडकून टीका, फोटोही केला शेअर, म्हणाली, “धर्माची मस्करी…”

View this post on Instagram

A post shared by Tillotama Shome (@tillotamashome)

पुढे तिने सांगितले की, “जेव्हा मी दिल्लीमध्ये होते त्यावेळी थंडीचे दिवस सुरु होते. मी बस स्टँडवर उभी होते . तेव्हा तिथे गाडी आली, थांबली आणि त्यातून सहा लोक बाहेर पडले. त्यांच्यापासून बचाव करण्यासाठी मी तिथून बाजूला झाले”.

आणखी वाचा -‘बिग बॉस ओटीटी’ लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार, ग्रँड फिनालेची तारीख जाहीर, कोण होणार विजेता?

त्यानंतर ती म्हणाली की, “रस्त्याच्या मधोमध आले आणि लिफ्ट मागू लागले. त्याचवेळी माझ्यासमोर एक मेडिकल साईन असलेली एक गाडी येऊन थांबली. तेव्हा वाटलं की ती गाडी सुरक्षित असेल म्हणून मी पुढील सीटवर बसले. त्यानंतर तिथे बाजूला बसलेल्या व्यक्तीने पॅंटची चैन उघडली आणि माझा हात पकडला. यापासून बचाव करण्यासाठी मी हात झटकला आणि स्वतःला मागे खेचले. त्यानंतर गाडी थांबवून त्या व्यक्तीने मला उतरण्यास सांगितले. हा सर्व प्रकार घडल्यानंतर मी खूप घाबरले होते”, असंही तिने सांगितलं.    

Tags: actressbollywoodtilottama shome
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Deepali Sayed First Post After Bigg Boss Marathi 6
Entertainment

पाच लाखांची बॅग सोडली आणि…; एलिमिनेट झाल्यानंतर दिपाली सय्यदची पहिली पोस्ट, म्हणाली, “माझ्यासाठी…”

एप्रिल 20, 2026 | 11:29 am
Next Post
28 july 2024 panchang mesh to meen rashi bhavishya see the details

सर्वार्थ सिद्धी योगामुळे रविवारचा दिवस यशस्वी जाणार, मेष, वृषभ राशीच्या संपत्तीत होणार वाढ, जाणून घ्या...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.