दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आकस्मिक निधनाने त्याच्या चाहत्यांसह मनोरंजन विश्वालाही मोठा धक्का बसला. सुशांतच्या निधनाला आता चारहून अधिक वर्ष झाले आहेत. मात्र त्याच्या आत्महत्येच्या प्रकरणाचा तपास अद्याप अपूर्णच आहे. सुशांत सिंहच्या मृत्यूबाबत अनेकदा अनेकांनी खळबळजनक खुलासे केले आहेत. अशातच आता सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीने सुशांत सिंहच्या मृत्यूबद्दल मोठा खुलासा केला आहे. सोमी अलीने सुशांतची हत्या झाल्याचा आणि एम्सच्या डॉक्टरांनी त्याच्या शवविच्छेदन अहवाल बदलल्याचा खळबळजनक दावा केला आहे. (Somy Ali Sushant Singh Rajput Murder Claim)
सोमी अलीने रेडिट या सोशल मीडिया माध्यमावर Ask Me Anything या प्रश्नोत्तरांच्या सत्रादरम्यान सुशांत सिंहबद्दल खुलासा केला. तसेच तिने हिंदी चित्रपट उद्योगाशी संबंधित धक्कादायक दावे केले आहेत. या प्रश्नोत्तरांच्या सत्रादरम्यान सोमीला विचारण्यात आले की, “सुशांत सिंह प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटते? बॉलिवूडने त्याला ज्या प्रकारे घेरले ते खरोखरच निराशाजनक आहे”. यावर सोमीने सुशांतच्या मृत्यूबद्दल धक्कादायक वक्तव्य केलं आहे.
यावर सोमीने उत्तर दिले की, “सुशांतची हत्या करण्यात आली होती आणि ती आत्महत्येसारखे दिसावी म्हणून त्याचा शवविच्छेदन अहवाल बदलला. एम्सच्या डॉक्टर सुधीर गुप्ता यांना विचारा. त्यांनी सुशांतचा शवविच्छेदन अहवाल का बदलला?” याआधीही जेव्हा सुशांतचा मृत्यू झाला तेव्हा सोमी म्हणाली होती की, “सुशांतने आत्महत्या केली आहे की नाही याची मला खात्री नाही”.
आणखी वाचा – लेक अबरामसाठी शाहरुख खानने खरेदी केली कोट्यवधींची कार, फक्त मोजक्याच व्यक्तींकडे आहे ही गाडी, फोटो व्हायरल
दरम्यान, सुशांत सिंह राजपूतबद्दल सांगायचे तर, १४ जून २०२० रोजी त्याचा मृतदेह मुंबईतील अपार्टमेंटमध्ये सापडला होता. ऑक्टोबर २०२० मध्ये, एम्स वैद्यकीय मंडळाने सुशांतच्या मृत्यूमध्ये हत्येची शक्यता नाकारली होती आणि त्याला ‘फाशी आणि आत्महत्येचे प्रकरण’ म्हटले होते. वृत्तानुसार, फॉरेन्सिक डॉक्टरांच्या सहा सदस्यीय टीमने ‘विषबाधा आणि गळा दाबून मारल्याचा आरोप फेटाळला होता.
आणखी वाचा – दुबईवरुन भाऊ येताच माहेरपणाच्या आठवणीत रमल्या विशाखा सुभेदार, डोळ्यांत पाणी आणणारी पोस्ट, कौतुकाचा वर्षाव
अभिनेत्याच्या मृत्यूप्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या एम्स फॉरेन्सिक मेडिकल बोर्डाचे अध्यक्ष डॉ. सुधीर गुप्ता यांनी पर्लला सांगितले होते की, फाशीशिवाय शरीरावर कोणत्याही जखमा नाहीत. ते म्हणाले होते, ‘हे फाशी आणि आत्महत्येचे प्रकरण आहे.’