रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

१३,३०० प्रयोग, ३९,९०० तास स्टेजवर आणि…; प्रशांत दामलेंच्या कारकिर्दीला संकर्षण कऱ्हाडेचा सलाम, म्हणाला, “वयाच्या ६४व्या वर्षी…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
सप्टेंबर 12, 2025 | 2:08 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Marathi actor Prashant Damle

१३,३०० प्रयोग, ३९,९०० तास स्टेजवर आणि…; प्रशांत दामलेंच्या कारकिर्दीला संकर्षण कऱ्हाडेचा सलाम, म्हणाला, "वयाच्या ६४व्या वर्षी…"

Marathi actor Prashant Damle : टेलिव्हिजन, चित्रपट, आणि रंगमंच या तीनही माध्यमांवर महत्त्वपूर्ण कामगिरी करत रसिकांच्या मनात घर करणारे अभिनेते म्हणजे प्रशांत दामले. प्रशांत दामले यांनी आजवर अनेक कलाकृतींमधून प्रेक्षकांची मनं जिंकली. सध्या ते रंगमंचाकडे वळले आहेत. तब्बल तीन दशकांहून अधिक काळ त्यांनी स्वतःला रंगमंचाकडे वळविलं. आजही त्यांच्या प्रत्येक नाटकासाठी हाऊसफुल्लचे बोर्ड लागलेले पाहायला मिळतात. अशा या रंगकर्मीचा प्रवास आज १३,३०० भागांपर्यंत पोहोचला आहे. यानिमित्त अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने खास पोस्ट लिहीत त्यांचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. संकर्षणने अगदी मोजक्या अंदाजात प्रशांत दामले यांचा प्रवास मांडत त्यांच्या मेहनतीला दाद दिली आहे.

संकर्षणने असं म्हटलं की, “आज आमच्या दामले सरांचा वैयक्तीक १३,३०० वा प्रयोग आहे. ‘ते रा ह जा र ति न शे’वा प्रयोग… म्हणजे काय झाले हो…? एका प्रयोगाचे ३ तास जरी म्हणलं तरी आयुष्याचे ३९,९०० तास स्टेजवर आहे हा माणूस त्याच ऊर्जेने. आता तुम्ही म्हणाल व्यवसाय आहे त्यांचा, त्याचे पैसे मिळतात त्यांना, मान्यच आहे. पण ३८ वर्षं कुठल्याही व्यवसायात किंवा मनोरंजनाच्या व्यवसायांत कधीही कंबरेखालचे विनोद न करता, नाटकाशी , नाटकाला आलेल्या प्रेक्षकांशी प्रामाणिक राहून, काम करणं सोप्पं नाही हो. नट म्हणून समोरच्या नटाचा विनोद न मारता त्याचाही हूरुप वाढवणं, समोरच्या नटाच्या विनोदालाही मोठं करणं फार फार अवघड आहे”.

आणखी वाचा – “ही एक प्रकारची फसवणूक आहे”, OLA कडून होणाऱ्या त्रासांनंतर मराठी अभिनेत्री संतापली, म्हणाली, “वेळेवर पैसे देऊनही…”

View this post on Instagram

A post shared by Sankarshann G Karhade (@sankarshankarhade)

पुढे त्याने लिहिलं आहे की, “निर्माता म्हणुन तरुण पोरांच्या पाठीशी ऊभं रहाणं हे ही सोप्पं नाही. माणूस म्हणुन पडत्या काळांत रंगमंच कामगारांचं स्वखर्चाने घर भरणं हे तर त्याहून सोपं काम नाही. महाराष्ट्र नाही भारतभर… भारत नाही तर जगभर जिथे जिथे म्हणून मराठी लोक राहतात तिथे तिथे जाऊन प्रयोग करणं , तिथल्या माणसांना नाटकाशी जोडून ठेवणं किती अवघड. मी त्या क्षेत्रांत फारच नवा आहे, पण लाखो किलोमिटरचा प्रवास, जागरणं करुन, न थकता, न कंटाळता एका प्रयोगांत ३ तास फ्रेश दिसणं किती अवघड आहे हे कळलंय मला. पण हा माणुस वयाच्या ६४व्या वर्षी आम्हाला लाजवेल असा ऊभा आहे हे कमाल आहे”.

आणखी वाचा – Paaru Serial Promo : अखेर अहिल्यासमोर आलं आदित्य-पारूच्या प्रेमाचं महासत्य, दोघांनाही घराबाहेर काढलं आणि…; मोठा ट्विस्ट

शेवटी त्यानं लिहिलं, “माणुस नसताना त्याची किंमत करण्यापेक्षा तो असतांना त्याचं मोल कळणं फार आवश्यक असतं. पण ३ पिढ्यांचं रंगमंचावरून मनोरंजन करणारं हे मराठी वैभव आपल्या महाराष्ट्रांत आहे हे आपणच मिरवणं फार महत्वाचं आहे, नाही का? खूप शुभेच्छा Prashant Damle सर. तुम्ही फार मौल्यवान आहात! (Post च्या background ला असलेलं गाणं त्यांचं Fav आहे…)”.

Tags: marathi actorprashant damlesankarshan karhade emotional post
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
thod tuz aani thod maz off air

"हा पूर्णविराम नाही", मालिकेच्या निरोपावर सुप्रसिद्ध अभिनेत्रीची पोस्ट, म्हणाली, "या माणसांशी…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.