नाटक म्हणजे जिवंत, मृत, पौराणिक, ऐतिहासिक किंवा काल्पनिक व्यक्ती अथवा प्राणी यांच्या भूमिका करणाऱ्या नटांनी रंगमंचावर सादर केलेली कला होय. याचसोबत कोणतेही पात्र साकारण्यासाठी कलाकाराला त्या पात्रामध्ये उतरून ते नाटक जगावं लागत तेव्हा एखाद नाटक सार्थकी लागतं.(Prashant damle)
१२५०० प्रयोगांचा पल्ला गाठणारं दर्जेदार व्यक्तिमत्व मराठी नाटककार आणि दिग्गज अभिनेते प्रशांत दामले हे सुद्धा ही तत्व पाळताना दिसतात. मालिकेत काम करताना ऑडियन्स नसतो तो आपली रेकॉर्ड केलेली भूमिका बघत असतो पण प्रशांत यांना अभिनय जगायला आवडतो तो प्रेक्षक उपस्थित असताना सादर करायला आवडतो असं ते म्हणतात. प्रशांत यांना नाटकांमध्ये विशेष रस आहे. म्हणून ते मालिका आणि चित्रपटांपेक्षा जास्त नाटकात काम करताना दिसतात. आजवर प्रशांत दामले त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. आणि त्यांच्या या पुरस्कारांमध्ये अजून एका पुरस्काराची वाढ झाली आहे. प्रशांत दामले त्यांना नुकताच “संगीत नाटक अकॅडमी पुरस्काराने” सन्मानित करण्यात आलंय.
मराठी नाटकासाठी हा अभिमानाचा क्षण(Prashant damle)
प्रशांत दामले यांनी फेसबुक अकाउंट वरून २ व्हिडिओ पोस्ट करत याबद्दल माहिती दिली आहे त्यांनी पोस्ट मध्ये लिहिलं आहे ” मराठी नाटकासाठी हा अभिमानाचा क्षण. ????????. हा खुप मोठ्ठा सन्मान आहे. माझ्या सर्व सहकलाकारांच्या वतीने, माझ्या कुटुंबाच्या वतीने, माझ्या सर्व बॅक स्टेज कलाकारांच्या वतीने आणि फक्त महाराष्ट्र, भारत नाही तर संपूर्ण जगातल्या मराठी नाट्य रसिकांच्या वतीने मी हा पुरस्कार अतिशय नम्रपणे स्वीकारत आहे.”

मराठी चित्रपटामध्ये प्रशांत दामले हे विनोदी अभिनेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी त्यांच्या करियरची सुरुवात टूर टूर या नाटकापासून केली. पुढे त्यांनी “मोरूची मावशी” या नाटकापासून व्यावसायिक नाटकाकडे वाटचाल केली. त्यांनी अनेक मराठी नाटके, सिनेमे तसेच मालिका केल्या आहेत त्यातील चार दिवस प्रेमाचे, एका लग्नाची गोष्ट, जादू तेरी नजर, गेला माधव कुणीकडे ही नाटके आणि याचबरोबर वाजवा रे वाजवा, सवत माझी लाडकी, पसंत आहे मुलगी, तू तिथं मी हे चित्रपट विशेष प्रसिद्ध झाले. त्यांच्या काही विशेष मालिका देखील खूप गाजल्या. “आम्ही सारे खवव्ये” या पाककृती कार्यक्रमातील त्यांची सूत्रसंचालन कार्याची पद्धत प्रेक्षकांना खूप आवडली.(Prashant damle)
====
हे देखील वाचा- ‘या’ अभिनेत्रीसोबत काम करायचं होत पण… स्वप्नील जोशीची ती पोस्ट चर्चेत
====
प्रशांत दामले हे केवळ एक अभिनेताच नाही तर एक उत्तम माणूस देखील आहेत. त्यांनी प्रशांत फॅन फाऊंडेशन नावाचे स्वतःचे फाउंडेशन सुरू केले आहे ज्याद्वारे ते समाजाच्या कल्याणासाठी सामाजिक कार्य करत असतात. त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या जल कार्यक्रमासाठी 1 लाख रुपये देणगी दिली आहे. तसेच अभिनेता प्रशांत दामले यांना लोकांना हसवायला खूप आवडते आणि ते हे काम त्यांच्या फॅन फाउंडेशनच्या माध्यमातून करत आहेत असे ते सांगतात.