मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘मुसंडी’ चित्रपटाला दिल्या शुभेच्छा

musandi marathi film
musandi marathi film

स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण काही सोप्पी गोष्ट नाही, मात्र मेहनत घेतली तरी ही गोष्ट काही कठीण ही नाही. निश्चित ध्येय, एकाग्रता आणि चिकाटीने अभ्यास करण्याची वृत्ती यामुळे या परीक्षांत यश नक्कीच मिळू शकतं हे ही तितकच खरं आहे. स्पर्धा परीक्षेसाठी जीवाच रान करणारी एक आशयघन कथा ‘मुसंडी’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाली आहे. (musandi marathi film)

या चित्रपटाचे पोस्टर अनावरण नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. सोनाई फिल्म क्रिएशन प्रस्तुत, गोवर्धन दोलताडे लिखित आणि निर्मित तसेच शिवाजी दोलताडे दिग्दर्शित ‘मुसंडी’ हा चित्रपट येत्या २६ मे ला प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाला आहे.

musandi
musandi

पोस्टर लाँच कार्यक्रमादरम्यान मंत्री संदीपान भुमरे, मंत्री उदय सामंत, मंत्री शंभूराज देसाई, मंत्री संजय राठोड, मंत्री गुलाबराव पाटील, रामदास कदम, अर्जुन खोतकर, खासदार हेमंत गोडसे, मा. शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार सुहास कांदे, आमदार संजय शिरसाट, आमदार शहाजीबाप्पू पाटील, आमदार ज्ञानराज चौगुले, आमदार शांताराम मोरे, आमदार बालाजी कल्याणकर व चित्रपट निर्माते गोवर्धन दोलताडे यांच्यासह मंत्रीमंडळातील अनेक सहकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘मुसंडी’ चित्रपटाला दिल्या शुभेच्छा

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना नियोजन ही बाब किती महत्वाची आहे. हे नियोजन कशाप्रकारे करावं हे सांगताना या परीक्षेतल्या अपयशाकडेही सकारात्मक दृष्टीने पहात जिद्दीने यश मिळवता येऊ शकते हे सांगणारा हा चित्रपट असल्याचे दिग्दर्शक शिवाजी दोलताडे यांनी सांगितले. वेगळ्या आणि आशयघन विषयासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘मुसंडी’ चित्रपटाला शुभेच्छा दिल्या आहेत. (musandi marathi film)

====

हे देखील वाचा – ट्रोलिंगवर नेटकऱ्यांना प्रतिउत्तर करत शिवने शेअर केली पोस्ट

====

रोहन पाटील आणि गायत्री जाधव ही जोडी या चित्रपटात मध्यवर्ती भूमिकेत पाहायला मिळणार असून या दोघांसोबत सुरेश विश्वकर्मा, शुभांगी लाटकर, तान्हाजी गळगुंडे, शिवाजी दोलताडे, सुरज चव्हाण, अरबाज शेख, प्रणव रावराणे, अक्षय टाक, घनश्याम दरवडे, सनमीता धापटे, वैष्णवी शिंदे, माणिक काळे, सुजीत मगर, मयुर झिंजे, ऋतुजा वावरे, विकास वरे, राधाकृष्ण कराळे यांच्या भूमिका आहेत. राज्यासह देशातील IAS, IPS आणि यशस्वी उदयोजक यांचे मार्गदर्शन घेऊन या चित्रपटाची कथा रचना करण्यात आली आहे. ‘मुसंडी’ चित्रपट २६ मे ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like
Lata Mangeshkar Maharashtra Shahir
Read More

महाराष्ट्र्र शाहीर या आगामी चित्रपटात गानकोकिळा लता मंगेश यांच्या भूमिकेत दिसणार ही अभिनेत्री

महाराष्ट्राला लाभलेल्या महान विभूतींपैकी एक ठरलेले व्यक्तिमत्व म्हणजे कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे. ‘जय जय महाराष्ट्र माझा..’…
Om bhutkar new movie
Read More

मुळशी पॅटर्न फेम राहुल्या दिसणार ऐतिहासिक चित्रपटात नवीन लुक मधील पोस्टर प्रदर्शित

‘पावनखिंड’, ‘सरसेनापती हंबीरराव’, ‘शेर शिवराज’ हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळावर आधारित असलेले चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाल्यानंतर आता…
Subhedar Film motion poster
Read More

‘रक्तामंदी उसळं तापता लाव्हा…’ अंगावर शाहारे आणणारं सुभेदारच मोशन पोस्टर प्रदर्शित

अखंड हिंदुस्थानचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या सहकारी शूर मावळे यांच्या जीवनावर आधारित चित्रपटांची सध्या चांगलीच चलती…
Ajinkya Raut New Movie
Read More

५ मे पासून बरसणार प्रेमाच्या ‘सरी’
अभिनेता अजिंक्य राऊतची नव्या चित्रपटाची घोषणा

तर प्रेक्षकांसाठी अजिंक्य ने नुकतीच एक महत्वाची आणि आनंदची घोषणा केली आहे. अजिंक्यची प्रमुख भूमिका असलेला ‘सरी’ हा…
sonalee kulkarni New Marathi Movie Tararani
Read More

मराठ्यांच्या अखंडित लढ्याची कहाणी उलगडणार मोगलमर्दिनी ‘छत्रपती ताराराणी’

स्वराज्याच्या तिन्ही छत्रपतींचे छत्र हरवल्यानंतर पोरक्या झालेल्या मराठा साम्राज्याला आपले वैयक्तिक दुःख बाजूला ठेवून आपल्या कर्तुत्वाने आधार देणाऱ्या…
onkar bhojne new movie
Read More

लंडनला होणार ‘कलावती’ चित्रपटाचं चित्रीकरण

मराठी चित्रपटांना सध्या चांगले दिवस आले असून मराठी सिनेसृष्टी खंबीरपणे सिनेविश्वात पाय रोवून कित्येक वर्ष उभी आहे. एकामागोमाग…