शुक्रवार, एप्रिल 3, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

प्रसाद ओकच्या मुलाचा साखरपुडा संपन्न; अमृता खानविलकरची खास उपस्थिती, शेअर केले खास फोटो, चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

Majja Webdeskby Majja Webdesk
जानेवारी 20, 2026 | 5:22 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Prasad Oak Son's Engagement

प्रसाद ओकच्या मुलाचा साखरपुडा संपन्न

Prasad Oak Son’s Engagement : मराठी मनोरंजनविश्वात सध्या बहुतेक कलाकारांनी लग्नगाठ बांधली. अनेक नामवंत कलाकारांच्या घरात विवाहसोहळे आणि साखरपुडे पार पडताना दिसले. चाहत्यांमध्येही या आनंदाच्या बातम्यांची विशेष चर्चा रंगली. अलीकडेच आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकर विवाहबंधनात अडकला. त्यानंतर आता लोकप्रिय अभिनेता प्रसाद ओक यांच्या कुटुंबातही आनंदाची बातमी समोर आली आहे. प्रसाद ओक यांचा मोठा मुलगा सार्थक ओक याचा नुकताच साखरपुडा पार पडला आहे.

या खास क्षणाची झलक अभिनेत्री अमृता खानविलकरने सोशल मीडियावर शेअर केली आहे. तिच्या पोस्टमुळे ही गोड बातमी चाहत्यांपर्यंत पोहोचली. शेअर केलेल्या फोटोंमध्ये ओक कुटुंबातील सर्व सदस्य आणि होणारी सून एकत्र दिसत आहेत. सार्थक ओकच्या होणाऱ्या पत्नीचं नाव रितू असून, अमृताने फॅमिली फोटो शेअर करत “तुझं कुटुंबात स्वागत आहे रितू” असं कॅप्शन दिलं आहे. या साखरपुडा सोहळ्याला अमृतासह तिची आईदेखील उपस्थित होती. याशिवाय अभिनेता समीर चौघुले, स्वप्नील जोशी यांसारख्या अनेक कलाकारांनी उपस्थिती लावत सार्थकला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. (Prasad Oak Son’s Engagement)

आणखी वाचा – मराठी कलाविश्वावर शोककळा; सुप्रसिद्ध कलादिग्दर्शकाचे निधन, ब्रेनस्ट्रोक झाला आणि…

दरम्यान, सार्थक ओकने जर्मनीमध्ये आपलं उच्च शिक्षण पूर्ण केलं आहे. दोन वर्षांपूर्वी त्याच्या पदवीदान समारंभासाठी संपूर्ण ओक कुटुंब जर्मनीला गेलं होतं. त्या वेळी प्रसाद ओक यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत मुलाच्या मेहनतीचं कौतुक केलं होतं. “आपल्यापासून दूर राहून शिक्षण घेण्याचा निर्णय धाडसी होता आणि आज त्या कष्टांचं फळ मिळालं,” अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या होत्या. विशेष म्हणजे काही काळापूर्वी सार्थकने आपल्या लाडक्या वडिलांना आलिशान कार गिफ्ट दिल्याचंही पाहायला मिळालं होतं. आता साखरपुड्याच्या या आनंदामुळे ओक कुटुंबात उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आहे. (Prasad Oak Son’s Engagement)

आणखी वाचा – मुलगा झाला हो! ‘साधी माणसं’ फेम अभिनेता झाला बाबा; चाहत्यांकडून भरभरुन शुभेच्छांचा वर्षाव

Tags: marathi actormarathi entertainment newsPrasad Oak Son's Engagement
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Prakash Raj mother death
Entertainment

“त्यांचा विश्वास नाकारणारा मी कोण?”, आईच्या अंत्यसंस्कारावर सुप्रसिद्ध अभिनेता ट्रोल, चोख उत्तर देत म्हणाला, “साधी गोष्ट…”

एप्रिल 3, 2026 | 11:08 am
Ahilyadevi Kirloskar and Shrikant Kirloskar
Entertainment

‘पारू’ मालिकेचा अचानक END, पण ‘ही’ जोडी दिसणार पुन्हा एकत्र, उत्सुकता वाढली

एप्रिल 3, 2026 | 9:53 am
Bigg Boss Marathi 6
Entertainment

Bigg Boss Marathi: तन्वीचं वचन तिच्या आजीने पूर्ण केलं, प्रभू शेळकेच्या कुटुंबाला दिली खास भेट

एप्रिल 3, 2026 | 12:00 am
Kamali Promo Update
Entertainment

‘कमळी’ मालिकेत मोठा TWIST! आजीचा विश्वासघात, कमळीला कानाखाली मारली अन् घराबाहेर काढलं

एप्रिल 2, 2026 | 5:02 pm
Next Post
Rasika Wakharkar Wedding

रसिक वखारकरचा लग्नसोहळा संपन्न; निवेदिता-अशोक सराफ यांची खास हजेरी, लग्नसोहळ्याचे फोटो समोर; लूकने वेधलं लक्ष

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.