बुधवार, जुलै 29, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

रसिक वखारकरचा लग्नसोहळा संपन्न; निवेदिता-अशोक सराफ यांची खास हजेरी, लग्नसोहळ्याचे फोटो समोर; लूकने वेधलं लक्ष

Majja Webdeskby Majja Webdesk
जानेवारी 20, 2026 | 5:55 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Rasika Wakharkar Wedding

निवेदिता-अशोक सराफ यांची खास हजेरी

Rasika Wakharkar Wedding : मराठी टेलिव्हिजन विश्वात आपल्या सहज अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री रसिका वाखारकर अखेर वैवाहिक आयुष्यात पदार्पण करताना दिसत आहे. काही दिवसांपासून रसिकाच्या लग्नाबाबत चर्चा सुरू होती आणि अखेर आज ती तिच्या आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात करत लग्नबंधनात अडकली आहे. रसिकाच्या लग्नसोहळ्यात अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेत्री निवेदिता सराफ यांची देखील उपस्थिती पाहायला मिळावी.

रसिकाने तिच्या लग्नाचे क्षण सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांपर्यंत पोहोचवले. लग्नापूर्वी तिने काऊंटडाऊन पोस्ट शेअर करत चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढवली होती. अखेर ती शुभांकर उंब्राणी यांच्यासोबत विवाहबंधनात अडकली आहे. लग्नसोहळ्यासाठी रसिकाने पारंपरिक हिरव्या रंगाची नऊवारी साडी परिधान केली होती. तिचा साधा पण उठावदार लूक चाहत्यांच्या विशेष पसंतीस उतरला. तर शुभांकरने पांढऱ्या रंगाचा कुर्ता आणि हिरव्या रंगाचं उपरणं घेत पारंपरिक वेशात दिसला. दोघांचे लग्नातील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, कमेंट्समध्ये चाहत्यांसह कलाकार मित्रमंडळी ही शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. (Rasika Wakharkar Wedding)

आणखी वाचा – प्रसाद ओकच्या मुलाचा साखरपुडा संपन्न; अमृता खानविलकरची खास उपस्थिती, शेअर केले खास फोटो, चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

View this post on Instagram

A post shared by Itsmajja Marathi (@itsmajja.marathi)

दोन दिवसांपूर्वी तिची ग्रहमुख विधी पार पाडली. त्यानंतर हळदी समारंभासाठी तिने पिवळ्या रंगाची साडी नेसली होती. या सगळ्या विधींचे खास क्षण रसिकाने सोशल मीडियावर शेअर केले होते, ज्याला चाहत्यांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. अभिनयाच्या बाबतीत बोलायचं झालं, तर ‘पिरतीचा वणवा उरी पेटला’ या मालिकेमुळे रसिका घराघरात पोहोचली. त्यानंतर ‘अशोक मा.मा’ या मालिकेतही तिने महत्त्वाची भूमिका साकारली होती. नुकतीच ही मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. (Rasika Wakharkar Wedding)

आणखी वाचा – मुलगा झाला हो! ‘साधी माणसं’ फेम अभिनेता झाला बाबा; चाहत्यांकडून भरभरुन शुभेच्छांचा वर्षाव

Tags: marathi actressmarathi entertainment newsRasika Wakharkar Wedding
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

dev anand son suneil anand dies
Entertainment

देव आनंद यांच्या मुलाचे निधन, ७०व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, अविवाहित राहिले कारण…

जुलै 29, 2026 | 10:34 am
 Badshah Isha Rikhi Marriage in Trouble
Entertainment

“मी गप्प राहिले कारण मला भीती वाटत होती”, सुप्रसिद्ध गायकाच्या पत्नीची धक्कादायक पोस्ट, चार महिन्यांपूर्वीच झालेलं लग्न…

जुलै 28, 2026 | 10:24 am
stories of Abhay Verma
Entertainment

मुलांनी घेरलं, घाणेरडं कृत्य केलं आणि…; भूमिकेची तयारी करताना सुप्रसिद्ध अभिनेत्याला समजलं होतं ट्रान्सजेंडर, म्हणालेला…

जुलै 27, 2026 | 11:10 am
Jasmin Bhasin Health Update
Entertainment

“मला गंभीर आजार आहे”, सुप्रसिद्ध अभिनेत्रीवर दुबईच्या रुग्णालयात सुरु होते उपचार, खूप वेदना आणि…

जुलै 27, 2026 | 9:55 am
Next Post
Bigg Boss Marathi 6 Update

'बिग बॉस'च्या घरात राशनचा तुडवडा; रोशन भजनकर-ओमकार राऊत भिडले, 'बिग बॉस' देणार पूर्ण घराला शिक्षा?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.