शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

प्रसाद ओक दिग्दर्शित ‘वडापाव’ या गोड कुटुंबाची तिखट लव्हस्टोरीचा लंडन येथे मुहूर्त संपन्न

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जुलै 12, 2023 | 11:37 am
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
Prasad Oak New Movie

Prasad Oak New Movie

प्रसाद ओक पुन्हा एकदा एका नव्या चित्रपटाच्या निमित्तानं दिग्दर्शकाच्या भूमिकेत आपल्याला दिसणार आहे. प्रसाद ओक दिग्दर्शित करत असलेल्या या चित्रपटाचं नाव ‘वडापाव’ असल्यामुळे प्रदर्शनाआधीच तो चर्चेत आला आहे. लंडनमध्ये नुकताच या चित्रपटाचा मुहुर्त सोहळा संपन्न झाला. आता प्रतिक्षा आहे ती जगप्रसिद्ध असलेला रुचकर वडापाव चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या किती पसंतीस पडणार याची.(Prasad Oak New Movie)

प्रसाद ओक दिग्दर्शित ‘वडापाव’ चित्रपटात सविता प्रभुणे,गौरी नलावडे,अभिनय बेर्डे,रितिका श्रोत्री, रसिका वेंगुर्लेकर,शाल्व किंजवडेकर आणि दस्तुरखुद्द प्रसाद ओक अशी मराठीतील तगडी स्टारकास्ट वेगवेगळ्या भूमिका साकारताना दिसणार आहेत. प्रसाद ओकच्या दिग्दर्शना अंतर्गत बनलेल्या आतापर्यंतच्या चित्रपटांनी प्रेक्षकांना कुटुंब आणि त्यातील नात्यांचा गोडवा नेहमीच अनुभवण्यास दिला. त्यामुळे अर्थातच प्रसाद ओकच्या आगामी ‘वडापाव’ चित्रपटाविषयी सर्वांनाच उत्सुकता आहे.

पाहा कोणते कलाकार झळकणार आहेत वडापाव चित्रपटामध्ये (Prasad Oak New Movie)

दिग्दर्शक प्रसाद ओक चित्रपटाविषयी सांगतात की प्रेमाला,लग्नाला आणि वडापाव खाण्याला वयाचं बंधन कधीही नव्हतं,नाही आणि नसेल. असं म्हणतात की “पुरुषाच्या मनात जाण्याचा रस्ता पोटातून जातो.” ह्या घरातल्या पुरषांच्या मनापर्यंत जाण्याच्या रस्त्यावर अनेक चमचमीत आणि झणझणीत जिन्नस आहेत, त्याची चव घ्यायला तयार रहा.(Prasad Oak New Movie)

हे देखील वाचा – दीप्ती केतकर दिसणार खलनायिकेच्या भूमिकेत

एबी इंटरनॅशनल फिल्म्स एलएलपी, एक्सआर स्टुडिओ,व्हिक्टर मुव्हिज लिमिटेड आणि अमेय विनोद खोपकर एंटरटेन्मेंट मिळून लवकरच प्रेक्षकांसाठी गोड कुटुंबाची तिखट लव्हस्टोरी असलेला ‘वडापाव’ हा चित्रपट घेऊन आपल्या भेटीस येत आहेत. या चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी अमित बसनीत,प्रजय कामत आणि स्वाती खोपकर यांनी उचलली आहे. तर चित्रपटाचे सह-निर्माते निनाद नंदकुमार बत्तीन,तबरेज पटेल,सनिस खाकुरेल हे आहेत.(Prasad Oak New Movie)

या चित्रपटाचे लेखन सिद्धार्थ साळवी यांनी केले आहे. तसंच,चित्रपटाच्या छायाचित्रणाची जबाबदारी संजय मेमाणे यांच्याकडे आहे.संगीतकार कुणाल करण ‘वडापाव’ या आगामी चित्रपटाचे संगीतकार आहेत तर मंदार चोळकर हे गीतकार आहेत. तेव्हा तयार रहा घमघमीत वडापावची झणझणीत चव अनुभवायला.

Tags: alia bhatt new moviebollywood new moviecomedy new moviedasara movie promotionsdasara movie songsdasara movie trailerentertainmenthindi new moviesits majjakaran johar new moviemoviemovie vadapav will be shoot in londonnani new movienew hindi movienew marathi moviesnew movie 2023new movie trailersprasad oak new movieprasad oak new movie vadapavromantic new movievadapav movie casts revealedvadapav movie shoot in londonvadapav movie update
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Kedar Shinde Feels Guilt

बाईपणच घवघवीत यश तरी केदार शिंदेनी केली खंत व्यक्त

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.