बाईपण भारी देवा या चित्रपटामुळे दिग्दर्शक केदार शिंदे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. महाराष्ट्र शाहीर या त्यांच्या चित्रपटानंतर लगेचच त्यांचा बाईपण भारी देवा या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. या चित्रपटाची कलाकारांच्या अभिनयासाठी, त्यांच्या व्यक्तिमत्वासाठी केदार शिंदे यांनी वैयक्तिक पोस्ट केल्या आहेत. दरम्यान केदार शिंदे यांनी ऑफस्क्रीन काम करणाऱ्या वेषभूषाकाराचेही कौतुक करत खास पोस्ट लिहिली आहे. दरम्यान या पोस्टमधील केदार शिंदे यांच्या एका वाक्याने सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. (Kedar Shinde Feels Guilt)
केदार शिंदे यांनी पोस्ट करत लिहिलं आहे की, काम करण्याचं काही वय नसतं! युगेशा वयाने लहान आहे पण, ज्या जबाबदारीने तीने #महाराष्ट्रशाहीर #बाईपणभारीदेवा या माझ्या दोन्ही सिनेमांची वेशभूषा सांभाळली त्याला तोड नाही. तीच्या आभ्यासू वृत्तीने तीने हे अति कठीण काम सोपं केलं. तीचं प्रत्येक गोष्टीतलं पेपर वर्क हे पाहाण्यासारखं असतं. कॅरेक्टर लेखक लिहितो पण ते उभं करताना वेशभूषेतल्या बारीकसारीक डिटेल्स युगा शोधून काढते.
पाहा केदार शिंदे यांनी कोणती व्यक्त केली खंत (Kedar Shinde Feels Guilt)
त्याने ते कॅरेक्टर जीवंत होतं. युगा माझी वहिनी आहे. पण त्यापेक्षा ती माझ्या मुली सारखीच आहे. पण जेव्हा काम करण्याची वेळ येते तेंव्हा मला “सर” म्हणते. या दोन्ही चित्रपटांच्या उद्या पारितोषिकासाठी तीची निवड झाली नाही तर, मला नवलच वाटेल. पण नाहीच मिळालं तरी युगा हरकत नाही, १६ सिनेमे करून मला तरी कुठे मिळालंय पारितोषिक? प्रेक्षकांसाठी आपण अव्याहत काम करायचं! असं म्हणत पोस्ट शेअर केली आहे.(Kedar Shinde Feels Guilt)
हे देखील वाचा – ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाचं नाव आधी काय होतं? माहिती आहे का?
त्यांच्या या पोस्टमधील १६ सिनेमे करून मला तरी कुठे मिळालंय पारितोषिक? या वाक्याने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. केदार शिंदे यांनी खंत व्यक्त केलेल्या पोस्टवर चाहत्यांनी त्यांना दिलासा देत प्रतिक्रिया दिली आहे. एका युजरने कमेंट करत लिहिलं आहे की, सर… शेवटचं वाक्य…पण प्रेक्षकांच्या मनात अजूनही तुमचे चित्रपट आहेत, त्या चित्रपटातील गाणी आहेत… तुमचा पुरस्कार म्हणजे तुम्ही अन् तुमचे चित्रपट प्रेक्षकांच्या मनात आहेत.