सोनी मराठी वर अबोल प्रीतीची गजब कहाणी ही मालिका १७ जुलैपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.प्रेक्षकांचा लाडका अभिनेता अजिंक्य राऊत आणि अभिनेत्री जान्हवी तांबट या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हे मालिकेच्या प्रोमो वरून समोर आलेच आहे. त्यामुळे मालिकेसाठी प्रेक्षक नक्कीच उत्सुक आहेत. (dipti ketkar new serial)
पंरतु मालिकेत नायक-नायिका जितके महत्वाचे असतात, तितकीच महत्वाची असते खलनायिका. मालिकेची कथा पुढे जाण्यात, मालिकेत अनेक रंजक वळण टिकवून ठेवण्याचं काम खलनायिका करत असतात. त्यामुळे खलनायिका किंवा खलनायक कोण असणार याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता असते.अबोल प्रीतीची अजब कहाणी या नव्या मालिकेत अभिनेत्री दीप्ती केतकर खलनायिकेची धुरा सांभाळणार आहे.
जाणून घ्या दीप्तीच्या नव्या भूमिकेविषयी (dipti ketkar new serial)
येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेत दिप्तीने स्वीटूच्या आईची नलु ही भूमिका साकारली होती, तिची ही भूमिका देखील घराघरात पोहचली. मला सासू हवी या मालिकेत दिप्तीने खलनायिका साकारली होती तर कमला या मालिकेत दीप्ती मुख्य भूमिकेत पाहायला मिळाली होती, तर अबोल प्रीतीची अजब कहाणी या नव्या मालिकेत दिप्तीला पुन्हा खलनायिका म्हणून पाहायला प्रेक्षक नक्कीच उत्सुक आहेत . (dipti ketkar new serial)
अभिनयासोबतच दीप्ती एक उत्तम डान्सर आहे. मराठी डान्स रिऍलिटी शो मध्ये देखील दिप्तीने तिच्या नृत्याची छाप पाडली. येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेला प्रेक्षकांचं भरभरून मिळालं.आता अबोल प्रीतीची अजब कहाणी पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी दीप्ती सज्ज आहे. आणि या नवीन भूमिकेत दिप्तीला पाहण्यासाठी प्रेक्षक देखील तितकेच उत्सुक आहेत.
हे देखील वाचा : मालिकेने घेतला निरोप -अभिनेत्री अश्विनी महांगडेने केला खुलासा