मराठीतील आघाडीची अभिनेत्री प्राजक्ता माळीने मालिका व चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारत प्रेक्षकांची मने जिंकली. एरव्ही आपल्या फोटोशूट्समुळे अनेकदा चर्चेत राहणारी प्राजक्ता सध्या तिच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आलेली आहे. प्राजक्ताचा ‘तीन अडकून सीताराम’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ज्यामध्ये ती एका महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. यानिमित्ताने प्राजक्ता चित्रपटाच्या टीमसह विविध ठिकाणी प्रमोशन करताना दिसत आहे. (Prajakta Mali share a story during Teen Adkun Sitaram shoot)
हृषिकेश जोशी लिखित, दिग्दर्शित व प्राजक्ता माळीची मुख्य भूमिका असलेली ‘तीन अडकून सिताराम’ चित्रपटाचं शूटिंग लंडनमध्ये झाले. शूटिंगवेळी प्राजक्तासह अन्य कलाकारांनी खूप धम्माल केली आहे. त्यादरम्यानचा एक किस्सा नुकताच प्राजक्ताने एका मुलाखतीत सांगितला. चित्रपटाच्या शूटिंगसाठी लंडनला जाणार असल्याने ती प्रचंड उत्सुक होती. कारण तिला लंडनमध्ये सौंदर्य प्रसाधने व बऱ्याच वस्तूंची खरेदी करायची होती. यासाठी ती पैसेसुद्धा घेऊन गेली होती. मात्र, शूटिंगमध्ये फारसा वेळ न मिळाल्याने तिची निराशा झाली. आणि तिला मनासारखी खरेदी करता आली नाही. त्याचवेळी आलोकचे कार्ड बंद पडले आणि तिच्याकडे भरपूर पैसे उरले असल्याने ते पैसे तिने आलोकला दिले.
हे देखील वाचा – ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’च्या सेटवर फावल्या वेळेचा केला जातो असा वापर, अभिनेत्रीने शेअर केलेला व्हिडिओ व्हायरल
हा किस्सा सांगताना प्राजक्ता माळी म्हणाली की, ”मला लंडनमध्ये भरपूर खरेदी करायची होती. परंतु माझ्या शूटिंगचे शेड्युल असे होते, की मला खरेदीसाठी वेळच मिळत नव्हता. अर्धा तासाचा माझा शॉट असला, तरी तो पूर्ण करण्यास माझा पूर्ण दिवस जायचा. शूट संपल्यानंतर मला जायच्या आधी केवळ अर्धा दिवस शॉपिंगसाठी मिळाला. त्यात मी माझ्या भाच्यांसाठी आणि जमेल त्या वस्तू खरेदी केल्या. मनासारखी खरेदी न झाल्याने माझे बरेच पैसे उरले. त्यात आलोकला गरज होती म्हणून मी माझ्याकडचे पैसे दिले. अर्थात आलोकने ते पैसे परत केले.”
हे देखील वाचा – सायली नाहीतर ही सुद्धा निवेदिता-अशोक सराफ यांची मानसकन्या? “मला तुझा अभिमान…”, निवेदिता सराफ यांनी शेअर केलेला व्हिडिओ चर्चेत
दिग्दर्शक हृषिकेश जोशीच्या ‘तीन अडकून सीताराम’ चित्रपटात प्राजक्ता व आलोकसह अभिनेता वैभव तत्ववादी, संकर्षण कऱ्हाडे, आनंद इंगळे व अन्य कलाकार दिसणार आहे. येत्या २९ सप्टेंबरला हा चित्रपट राज्यभर प्रदर्शित होणार आहे.