Phullwanti Trailer : पद्माविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या ‘फुलवंती’ या प्रसिद्ध कादंबरीवर आधारित ‘फुलवंती’ हा चित्रपट ११ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने ‘फुलवंती’ची प्रमुख लक्षवेधी भूमिका साकारली. पेहशवाईत लोककला व लोककलावंत यांना मोठा राजश्रय मिळत असे या काळात फुलवंती आपली कला सादर करण्यासाठी मुघल दरबारात जात असे. मुघल दरबारात जाऊन ही फुलवंती तिच्या नृत्यकलेने सर्वांची मन जिंकण्याचा प्रयत्न का करते?, या प्रश्नाचे उत्तर या चित्रपटातून उलगडणार आहे.
नुकताच ‘फुलवंती’ या चित्रपटाचा भव्यदिव्य ट्रेलर लॉन्च सोहळा पार पडला. यावेळी चित्रपटातील संपूर्ण टीम उपस्थित असलेली पाहायला मिळाली. शिवाय चित्रपटाच्या दिमाखदार ट्रेलरने साऱ्यांची उत्सुकता अधिक ताणली गेली. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये फुलवंतीचा झालेला अपमानाचा बदला तिने घेतलेला पाहायला मिळत आहे. पेशव्यांनी केलेल्या चुकीचा शिक्षा त्यांच्याच दरबारात त्यांना फुलवंती कशी मिळवून देते हे या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. मोघलकालीन चित्रीकरण असलेल्या या चित्रपटाची भव्यता वाखाणण्याजोगी आहे, हे ट्रेलरमधून स्पष्ट होत आहे.
आणखी वाचा – Bigg Boss 18 च्या १८ सदस्यांची नावं समोर, कोण ठरणार सर्वाधिक वरचढ, वाचा संपूर्ण यादी
स्नेहल प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘फुलवंती’ या चित्रपटात प्राजक्ता माळीसह प्रसाद ओक, गश्मीर महाजनी, वैभव मांगले, हृषिकेश जोशी, स्नेहल, मंगेश देसाई, जयवंत वाडकर, समीर चौघुले, चिन्मयी सुमित, सविता मालपेकर, विभावरी देशपांडे, क्षितीश दाते, गौरव मोरे, वनिता खरात, रोहित माने, पृथ्वीक प्रताप, चेतना भट, विजय पटवर्धन, सुखदा खांडकेकर, अदिती द्रविड, निखिल राऊत, दीप्ती लेले, राया अभ्यंकर आदि मराठीतील नामवंत कलाकारांची फौज दिसणार आहे.
‘फुलवंती’ ही मंगेश पवार अँड कंपनी आणि ‘शिवोऽहम् क्रिएशन्स प्रायव्हेट लिमिटेड’ निर्मित भव्य कलाकृती ११ ऑक्टोबरला रसिकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचे संवादलेखन प्रविण विठ्ठल तरडे यांचे असून दिग्दर्शन स्नेहल प्रविण तरडे हिने केले आहे. चित्रपटाच्या छायाचित्रणाची जबाबदारी महेश लिमये यांनी सांभाळली आहे. तर कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, मंगेश पवार, श्वेता माळी, प्राजक्ता माळी यांनी चित्रपटाच्या निर्मितीची धुरा पेलवली आहे. तर अमोल जोशी प्रॉडक्शन, मुरलीधर छटवानी, रविंद्र औटी यांनी चित्रपटाच्या सहनिर्मितीची बाजू सांभाळली आहे.