Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व विशेष धुमाकूळ घालताना दिसलं. यंदाच्या पर्वात आलेल्या स्पर्धकांनी हे पर्व विशेष गाजवलं असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. मात्र यंदाचे हे पर्व १०० दिवसांचे नसून ७० दिवसांचे असणार असल्याचं ‘बिग बॉस’ यांनी अधिकृत रित्या घोषित केलं. उद्या या लोकप्रिय, चर्चेत असलेल्या रिऍलिटी शोचा महाअंतिम सोहळा पार पडणार आहे. ‘बिग बॉस’च्या घरात सगळे स्पर्धक चर्चेत राहिले, मात्र एका जोडीची विशेष चर्चा रंगली ती म्हणजेच निक्की तांबोळी व अरबाज पटेल. निक्की व अरबाज यांनी शोमध्ये येण्याच्या अगदी पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली. या शोमध्ये येताना दोघेही एकत्र आले त्यामुळे त्यांच्यात आपसूकच मैत्री झालेली पाहायला मिळाली आणि कालांतराने या मैत्रीचे रूपांतर प्रेमात होताना झालेले दिसलं.
अरबाज व निक्की एकमेकांसाठी लढताना, एकमेकांसाठी खेळताना तसेच एकमेकांना आधार देताना दिसले. बरेचदा दोघे एकमेकांबरोबर वेळ घालवताना दिसले. टास्क दरम्यान अरबाज निक्कीच्या मागे खंबीरपणे उभा राहताना दिसला. एकूणच त्यांच्या या मैत्रीचं नेहमीच कौतुक केलं गेलं. मात्र बरेचदा अरबाज व निक्कीमध्ये वादही झालेले पाहायला मिळाले. एकमेकांच्या मनाला गोष्टी न पटल्याने त्यांच्यात वाद झाल्याचं दिसलं. मात्र हे वाद कालांतराने मिटत गेले आणि त्यांची मैत्री पुन्हा उभारत गेली. जेव्हा अरबाजच्या एलिमिनेशनची गोष्ट कानावर आली तेव्हा निक्की धायमोकलून रडू लागली.
अरबाज घराबाहेर पडला आहे हे निक्कीला पचवणं फार कठीण झालं. शिवाय अरबाज गेल्यानंतर आता निक्की एकटी पडणार या भीतीने ती घरात वावरू लागली मात्र कालांतराने स्वतःला सावरत ती वाघिणीसारखी उभी राहिली. आता पुन्हा एकदा अरबाज ‘बिग बॉस’च्या घरात आल्याचं पाहायला मिळत आहे. ‘बिग बॉस’च्या घरात नुकताच काही दिवसांपूर्वीच फॅमिली विक पार पडला. यानंतर आता ‘बिग बॉस’च्या पाचव्या सीझनमधील सर्व स्पर्धक पुन्हा एकदा फायनल असलेल्या स्पर्धकांना पाठिंबा देण्यासाठी येणार असल्याचे समोर आले. त्यावेळी अरबाजला पाहून निक्कीचा चेहरा पडलेला दिसला. कारण निक्कीला फॅमिली वीकमध्ये आलेल्या तिच्या आईने अरबाजच्या साखरपुड्याची बातमी कानावर आली असल्याचे सांगितलं.
आणखी वाचा – नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी मकर व मीन राशीच्या लोकांना व्यवसायात फायदा, इतरांच्या नशिबात काय, जाणून घ्या…
त्यामुळे निक्कीने अगदी त्याच दिवशी अरबाजशी पुन्हा न बोलण्याचा आणि त्याचा सामान फेकून देण्याचा निर्णय घेतला. मात्र आता अरबाज आणि निक्की अखेर एकमेकांसमोर आले आहेत. यानंतर अरबाज धावत घरात येतो आणि निक्कीला उचलून घेतो. त्यानंतर तो निक्कीला बेडरूम एरियामध्ये घेऊन जात तिच्याशी एकांतात बोलताना दिसतोय. अरबाज निक्कीचा हात हातात घेत म्हणतो, “तुला असं वाटेल की, मी जाताना रडलो नाही”. तर निक्की रागात अरबाजला बोलते, “मला असं वाटलं तुझं बाहेर लफडं म्हणून तू तुटला नाही”. आता अरबाज त्याची बाजू निक्कीसमोर मांडेल का?, निक्की त्याची बाजू समजून घेईल का?, हे सार पाहणं रंजक ठरेल.