Myra Vaikul Brother Name Ceremony : मराठी मालिकाविश्वातील नेहमीच चर्चेत असणारी बालकलाकार म्हणजे मायरा वायकुळ. मायराने आजवर तिच्या भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतील मायराच्या भूमिकेने साऱ्यांची मनं जिंकली. यानंतर मायरा ‘कलर्स टीव्ही’वरील ‘नीरजा: एक नयी पहचान’ या मालिकेत झळकली होती. या हिंदी मालिकेत मायरा अभिनेत्री स्नेहा वाघबरोबर प्रमुख भूमिकेत दिसली. त्यानंतर मायराने सिनेविश्वात पदार्पण केलं. परेश मोकाशी दिग्दर्शित ‘नाच गं घुमा’ चित्रपटात ती पाहायला मिळाली. मायरा सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. नेहमीच ती काही ना काही शेअर करत असते. सोशल मीडियावर मायराचे अनेक व्हिडीओ व्हायरल होताना पाहायला मिळतात.
अशातच मायराच्या युट्युब अकाउंटवरुन तिच्या लहान भावाच्या नामकरण सोहळ्याचा खास व्हिडीओ शेअर केला आहे. वैयक्तिक आयुष्याबाबत तिच्या सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही शेअर करण्यात येते. अशातच मायराच्या भावाच्या बारशाचा सुंदर असा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये वायकुळ कुटुंबाची लगबग पाहायला मिळतेय. बाळाच्या नामकरण सोहळ्यासाठी खास राजगड बनवण्यात आलेला पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा – ‘पुष्पा २’ची कथा योग्य नसल्याचं म्हणत अनेकांनी हिणवलं, आता त्याच चित्रपटाची कमाई तब्बल…
अत्यंत पारंपरिक अंदाजात हा सोहळा संपन्न झाला असल्याचं पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये पाहायला मिळाल्याप्रमाणे मायराने लाडक्या भावाच्या बारशाला खास परकर, पोलकं परिधान केलं आहे. तर तिच्या आईने नऊवारी साडी नेसून त्यावर मराठमोळे दागिने परिधान केले आहेत. तर वडिलांनी अंगरखा परिधान करत हा मराठमोळा लूक पूर्ण केला आहे. तिघांचा हा लूक अगदी राजगडाला साजेसा होता. तर चिमुकल्या बाळालाही पारंपरिक कपडे परिधान केले होते. मायराच्या चिमुकल्या भावाचं नाव त्यांनी व्योम असं ठेवलं आहे.
आणखी वाचा – Tharla Tar Mag : “शेवटी सासू ती सासूच असते”, कल्पनाने सायलीला हाताला धरुन काढलं बाहेर, प्रोमोवर नेटकरी भडकले
मायरा वायकुळ आता व्योमची मोठी ताई झाली आहे. १५ सप्टेंबरला श्वेता वायकुळ यांनी एका गोंडस मुलाला जन्म दिला. त्यामुळे सध्या वायकुळ कुटुंबातला आनंद द्विगुणित झाला आहे. काही दिवसांपूर्वीच मायराच्या चिमुकल्या भावाची पहिली झलक पाहायला मिळाली. त्यांनतर आता अगदी राजेशाही थाटामाटात साजरा केलेल्या नामकरण सोहळ्याने साऱ्यांचे लक्ष वेधलं आहे.