टेलिव्हीजनवरील ‘तारक मेहता का उलटा चश्मा’ ही मालिका मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे. या मालिकेतील सर्वच भूमिका प्रेक्षकांच्या अधिक लक्षात राहिल्या आहेत. गेल्या १५ वर्षांपासून प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन करत आहे. या शोने जगभरातील प्रेक्षकांना वेड केलं आहे. या शोमधील प्प्र्त्येक कलाकाराचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. हा शो दिशा वाकानीपासून शैलेश लोढापर्यंत सोडण्यापर्यंत अनेक बातम्या प्रसिद्ध झाल्या. लहान टप्पूची भूमिका साकारणारा भव्य गांधी हा अधिक चर्चेत राहला. त्याने अनेक वर्ष काम केल्यानंतर या मालिकेला रामराम केला. (bhavya gandhi on taarak mehta ka oolta chashma leave show)
भव्य आता २७ वर्षांचा झाला आहे. जेव्हा भव्यने मालिका सोडली तेव्हा तो नऊ-दहा वर्षांचा होता. आता इतक्या वर्षानंतर त्याने ‘तारक मेहता…’ मालिका सोडण्यामागचं कारण सांगितलं आहे. त्याला या मालिकेतील भूमिकेसाठी प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले होते. मात्र मालिका सोडण्या मागे त्याची काही वेगळी कारणं होती जी त्याने आता सांगितली आहेत. ‘टेलि टॉक’ बरोबर बोलताना त्याने सांगितले कि, “तेव्हा मला सगळे म्हणाले की तुला काम करायचं असेल तरीही आम्ही तुझ्याबरोबर आहोत आणि नसेल करायचं तरीही आम्ही तुझ्याबरोबर आहोत”.
पुढे त्याने सांगितले की, “मी त्यावेळी खूप घाबरलो होतो हे मला आठवत आहे. जो कायदेशीर करार असतो तो पूर्ण करुनच मी मालिका सोडली होती. यामध्ये तीन महिन्यांचा नोटिस पिरीयड असतो. पण मी तो नऊ महीने केला होता. मालिकेचे निर्माते मला जाऊ देत नव्हते. पण सगळ्यांनी त्यांना समजावले. त्यानंतर त्यांनी मला मालिका सोडण्याची परवानगी दिली. ही मालिका सोडणे माझ्यासाठी खूप कठीण होते”.
‘तारक मेहता…’ सोडल्यानंतर भव्य ‘अजब रात नी गजब वात’, ‘केवटलाल परिवार’, ‘तारी साठे’, ‘बाऊ ना विचार’ व ‘पप्पा तमनेनही समझाय’ या चित्रपट व मालिकांमध्ये दिसून आला आहे. दरम्यान सध्या तो हिंदी चित्रपटसृष्टीमधून दूर असलेला दिसून आला नाही.