शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

CID Promo : नव्या स्टाइलमध्ये दयाने तोडला दरवाजा, ‘सीआयडी’च्या नव्या प्रोमोमध्ये दिसला रॉकिंग अंदाज, कधी सुरु होणार?

Shamal Sawantby Shamal Sawant
नोव्हेंबर 23, 2024 | 2:56 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
CID new promo

सीआयडीचा नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला

सध्या सीआयडी ही मालिका पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. १९९८ ते २०१८ या कालावधीमध्ये या मालिकेने प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले आहे. आता पुन्हा एकदा नव्याने ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेतील सर्वच भूमिका प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहेत. ‘कुछ तो गडबड है’, ‘दया दरवाजा तोड दो’ असे अनेक संवाद आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. या मालिकेचे चित्रीकरण सुरु करण्यात आले आहे.  या मालिकेचा प्रोमोदेखील समोर आला आहे. यामध्ये आता दया जखमी अवस्थेत दिसून आला आहे. तसेच ही मालिका कधी येणार आणि कुठे बघायला मिळणार? याबद्दलदेखील माहितीदेखील देण्यात आली आहे. (CID new promo )

सोनी टीव्हीवर एक प्रोमो प्रदर्शित कला आहे. यामध्ये त्याच्या शरीरावर एक पट्टी बांधलेली दिसत आहे. तसेच तो म्हणतो की, “विरोधकांना वाटलं की मला मारणं खूप सोपं आहे , पण ते विसरले आहेत. त्यांच्या लक्षात आणून द्याव लागेल. परत येणार नाही इतका मी लांब गेलो नाही. तसेच जो सहज मरेल तो दया नाही”.

आणखी वाचा – “पौर्णिमेचा चंद्र सौम्य असला तरी…”, देवेंद्र फडणवीसांच्या विजयानंतर सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याची पोस्ट, म्हणाला, “सूर्य पुन्हा एकदा…”

View this post on Instagram

A post shared by Sony Entertainment Television (@sonytvofficial)

यावेळी दया गुंडांच्या मागे धावतो. तसेच नंतर आवाज येतो की ‘दया दरवाजा तोड दो’. या मालिकेच्या निमित्ताने शिवाजी साटम, आदित्य श्रीवास्तव, दया शेट्टी पुन्हा एकदा धुमाकुळ घालण्यासाठी सज्ज झाले आहेत. मात्र या तिघा कलाकारांव्यतिरिक्त अजून कोणते कलाकार दिसणार आहे? याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आली नाही. मात्र प्रेक्षकवर्ग ही मालिका पाहाण्यासाठी मोठ्या प्रमाणात उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – आजारपणात अमोलला करावं लागलं टक्कल, प्रोमो पाहिल्यानंतर प्रेक्षकही भावुक, अप्पी-अर्जुनसाठीही कठीण काळ

२१ डिसेंबर रोजी ही मालिका सोनी एंटरटेनमेंट चॅनलवर शनिवार व रविवार रात्री १० वाजता प्रसारित केली जाणार आहे. जेव्हा सीआयडीचा शेवटचा एपिसोड दाखवण्यात आला तेव्हा अभिजीत व दया यांना गोळी लागल्याचे दिसून आले होते. ते दोघंही दरीत कोसळले होते. आता त्यापुढे काय झालं? आपल्याला पुढील भागांमध्ये पाहायला मिळणार आहे. या प्रोमोआधी मुहूर्त पूजा करतानाचा व्हिडीओदेखील समोर आला होता. तसेच या मालिकेचे निर्माते बीपी सिंह यांनी चित्रीकरण सुरु झाल्याची अधिकृत माहिती दिली होती.

Tags: cidnew promopopular serial
Shamal Sawant

Shamal Sawant

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
swara bhaskar husband on election

स्वरा भास्करचे पती फहाद अहमद निवडणुकीत पराभूत, अणुशक्ती नगरमधून सना मलिक यांच्याकडे विजयाचा झेंडा

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.