रविवार, जून 7, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘स्टारप्रवाह’वरचा लोकप्रिय चेहरा अडकला लग्नबंधनात; सेटवरच जुळलं प्रेम, चार वर्षांचं रिलेशन आणि…

Majja Webdeskby Majja Webdesk
फेब्रुवारी 23, 2026 | 11:27 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Aetasha-Nishad Wedding

'स्टारप्रवाह'वरचा लोकप्रिय चेहरा अडकला लग्नबंधनात

Aetasha-Nishad Wedding : मराठी कलाविश्वात सध्या लग्नसराईचे वातावरण रंगलेले दिसत आहे. एकामागून एक कलाकार आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात करताना पाहायला मिळत आहेत. अशातच आणखी एका लोकप्रिय अभिनेत्रीने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. ‘स्टारप्रवाह’ वाहिनीवरील ‘तुझ्या सोबती’ने या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री एतशा संझगिरी हिने अभिनेता निषाद भोईर याच्यासोबत लग्नगाठ बांधली आहे. २२ फेब्रुवारी रोजी कुटुंबीय आणि जवळच्या मित्रपरिवाराच्या उपस्थितीत दोघांनी सात फेरे घेत नव्या आयुष्याची सुरुवात केली. लग्नसोहळा पारंपरिक मराठमोळ्या थाटात पार पडला. एतशाने पारंपरिक मराठमोळा लूक केला होता.तर निषादनेही मराठमोळ्या वेशात सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

या जोडीचा साखरपुडा ऑक्टोबर २०२५ मध्ये मोठ्या उत्साहात पार पडला होता. त्यानंतर चाहत्यांना त्यांच्या लग्नाची उत्सुकता लागली होती. अखेर प्रतीक्षेला पूर्णविराम देत दोघेही ‘साता जन्माचे सोबती’ झाले आहेत. त्यांच्या लग्नासाठी अनेक मराठी कलाकारांनी उपस्थिती लावून नवदाम्पत्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. एतशा आणि निषाद यांची पहिली भेट ‘दख्खनचा राजा जोतिबा’ या मालिकेच्या सेटवर झाली होती. कोल्हापुरात सुरू असलेल्या शूटिंगदरम्यान दोघांची ओळख वाढली. याच काळात एका खास भेटीत निषादने आपल्या भावना एतशासमोर व्यक्त केल्या आणि त्यांच्या नात्याची सुरुवात झाली. विशेष म्हणजे रिलेशनशिप सुरू झाल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांत एतशाने ही गोष्ट घरच्यांना सांगितली होती.

आणखी वाचा – रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडाची लगीनघाई, दोघेही जयपूरला रवाना, Wedding Glowने वेधलं लक्ष

सुमारे चार वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर अखेर या लोकप्रिय जोडीने लग्नबंधनात अडकत आपल्या प्रेमकथेचा नवा अध्याय सुरू केला आहे. चाहत्यांकडून आणि सहकलाकारांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत. सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. नव्या आयुष्यासाठी एतशा आणि निषाद यांना सर्वांकडून मनापासून शुभेच्छा दिल्या जात आहेत.

आणखी वाचा – “लिमिट्स क्रॉस करू नकोस”, भाऊच्या धक्क्यावर राखी-रुचितामध्ये राडा, “तुम्ही लवलपाटा करता…”

Tags: Aetasha-Nishad Weddingmarathi actressmarathi entertainment news
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
late night eating
Entertainment

रात्री नऊ नंतर जेवताय?, हृदयाच्या आरोग्यावर होऊ शकतो मोठा परिणाम, वाचा सविस्तर

जून 6, 2026 | 12:08 pm
 Tea And Health
Entertainment

चहा पिण्याला कोणतं वय योग्य?, आजारी पडण्याआधी जाणून घ्या सविस्तर…

जून 5, 2026 | 12:10 pm
Does Coffee Cause Dehydration
Entertainment

कॉफी प्यायल्याने Dehydration कमी होते का?, मोठा गैरसमज होणार दूर, वाचा सविस्तर

जून 4, 2026 | 12:00 pm
Next Post
Jahnavi Killekar little fans

मागील दोन वर्षांपासून कर्करोगाशी झुंज, असह्य वेदना आणि…; छोट्या फॅनची जान्हवी किल्लेकरने पूर्ण केली इच्छा, डोळ्यांत पाणी आलं आणि…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.