गुरूवार, जून 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मागील दोन वर्षांपासून कर्करोगाशी झुंज, असह्य वेदना आणि…; छोट्या फॅनची जान्हवी किल्लेकरने पूर्ण केली इच्छा, डोळ्यांत पाणी आलं आणि…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
फेब्रुवारी 23, 2026 | 11:58 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Jahnavi Killekar little fans

मागील दोन वर्षांपासून कर्करोगाशी झुंज, असह्य वेदना आणि…; छोट्या फॅनची जान्हवी किल्लेकरने पूर्ण केली इच्छा, डोळ्यांत पाणी आलं आणि…

Jahnavi Killekar little fans : अभिनेत्री जान्हवी किल्लेकरने आजवर अनेक भूमिकांमधून रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. आधी मालिका, मग ‘बिग बॉस’ मराठी आणि त्यानंतर the 50 या शोमधून तिने स्वतःच स्थान निर्माण केलं. सोशल मीडियावर जान्हवी बऱ्यापैकी सक्रिय असते. नेहमीच ती काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. जान्हवीचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. बरेचदा पाहुणी म्हणून तिला आमंत्रितही केलं जातं. जान्हवी जितकी बिनधास्त आहे तितकीच ती समंजस, इमोशनल आहे. अशातच जान्हवीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेल्या एका पोस्टने तिच्यातील भावुकपणाची प्रचिती येते.

जान्हवीने नुकतीच एक फॅन मुमेंट सांगितली. आणि यावेळी ती भावुक झाल्याचं दिसली. तिने पोस्टमध्ये लिहिलं, “मागील दोन वर्षांपासून एक छोटासा जीव कॅन्सरसारख्या असह्य वेदनांशी झुंज देतोय. हॉस्पिटलच्या त्या चार भिंतींमध्ये अडकलेला असताना, वेदनांनी थकलेला असताना तो माझे आणि ओमचे व्हिडीओ पाहायचा आणि म्हणायचा , “हे बघितलं की मला थोडंसं बरं वाटतं”. हे ऐकून मन अक्षरशः पिळवटून गेलं. आपण कधी कल्पनाही करत नाही की आपलं हसणं, आपला एक साधा व्हिडीओ, कोणासाठी औषधासारखा ठरु शकतो.
त्याने आई-वडिलांना व चुलते यांना व्हिडीओ दाखवून आमच्या दोघाना भेटायची इच्छा सांगितली. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ओमसह संपर्क साधला. जेव्हा ओमने हे सर्व कॉलवर मला सांगितले तेव्हा तो अक्षरशः रड़त होता. माझेही डोळे पाणावले होते. क्षणात ठरलं जायचंच”.

आणखी वाचा – रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडाची लगीनघाई, दोघेही जयपूरला रवाना, Wedding Glowने वेधलं लक्ष

View this post on Instagram

A post shared by Jahnavi Kiran Killekar (@jahnavikillekar)

पुढे ती म्हणाली, “कला क्षेत्रात काम करत असल्याचा अभिमान वाटला. म्हणतात ना. एक अश्रु पुसावयास जरी जन्म कामास आला. त्या निरागस इच्छेला आम्ही कसं नाही म्हणणार? १८ तारखेला त्याचा डिस्चार्ज होता. आणि आम्ही त्या दिवशीच नवी मुंबईतील खारघर येथे टाटा मेमोरेबल कॅन्सर हॉस्पिटलमध्ये त्याला भेटायला गेलो. ओम तर छत्रपती संभाजीनगरचा आदल्या रात्रीचा शो संपवून ५०० किलोमीटरचा प्रवास रात्रभर करत मुंबईत पोहोचला होता. सर्वाना हसवनारा ओम तेवढ़ाच संवेदनशील व हळवा आहे”.

आणखी वाचा – ‘लग्नाची बेडी’ फेम अभिनेत्रीने घेतलं हक्काचं घर! गृहप्रवेशाचे फोटो समोर, प्रेक्षकांकडून शुभेच्छांचा वर्षाव

शेवटी तिने लिहिलं, “ही त्याच्यासाठी सरप्राइज भेट होती. त्याच्या खोलीत शिरताच त्याच्या डोळ्यांत चमक आली. चेहऱ्यावर एक गोड, थोडंसं थकलंलेलं पण मनापासूनचं हास्य उमटलं. तो क्षण आयुष्यभर विसरता येणार नाही. त्याने आमचा हात घट्ट धरला… जणू काही सांगत होता, “तुम्ही आलात ना, आता मी मजबूत आहे”. त्या छोट्याशा हातात किती वेदना होत्या, पण त्याहून जास्त धैर्य होतं. आपण बाहेरच्या जगात किती छोट्या गोष्टींवर तक्रार करतो. आणि इथे एक छोटासा योद्धा प्रत्येक दिवस जगण्यासाठी लढतोय, तरीही हसतोय. तो आम्हाला शिकवून गेला, जीवन कितीही कठीण असलं, तरी आशा सोडायची नाही. देवा… त्या छोट्या जीवाला खूप खूप बळ दे. त्याच्या वेदना कमी कर. त्याच्या चेहऱ्यावरचं ते हास्य कायम ठेव. आज मन खूप भरुन आलं आहे. कृपया सगळ्यांनी त्याच्यासाठी एक छोटीशी प्रार्थना करा ही विनंती कारण अजुनही तो नशीबा सोबत लढ़तोय”.

Tags: fan mofan momentjahnavi killekar
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Shalva Kinjawadekar new serial
Entertainment

चार महिने तीन तास वर्कआउट आणि…; भूमिकेसाठी फिटनेसकडे लक्ष देतोय मराठी अभिनेता, नव्या मालिकेत झळकणार

जून 17, 2026 | 3:39 pm
sanchita ugale suicide
Entertainment

“लोकं मला घाबरतात, माझे सगळे पैसे संपले”, आत्महत्येपूर्वी अभिनेत्री सहा महिने डिप्रेशनमध्ये, डॉक्टरांशी संवाद उघड

जून 17, 2026 | 12:15 pm
Rushi Manohar Marathi Actor
Entertainment

मराठी सिनेविश्वाचा आश्वासक नायक ऋषी मनोहर, लवकरच ‘कप बशी’ चित्रपटात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

जून 17, 2026 | 10:52 am
sanchita ugale death reason
Entertainment

लेकीवर अत्याचार, पैशांची, इतर गोष्टींची मागणी आणि…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या आत्महत्येनंतर वडिलांचा मोठा खुलासा, म्हणाले…

जून 17, 2026 | 9:42 am
Next Post
Tharal Tar Mag Director Buys New Home

युरोपियन स्टाईल प्रवेशद्वार, आलिशान फ्लॅट अन्…; 'ठरलं तर...' फेम दिगदर्शकाने घेतलं हक्काचं घर! व्हिडीओ समोर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.