मंगळवार, जून 9, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“मला मारा अन्…”, मृत्यूच्या खोट्या बातमीनंतर पूनम पांडेने तिरस्कार करणाऱ्यांना सुनावलं, म्हणाली, “तुम्ही ज्याच्यावर…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
फेब्रुवारी 6, 2024 | 11:03 am
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
Poonam Pandey Fake Death News

"मला मारा अन्…", मृत्यूच्या खोट्या बातमीनंतर पूनम पांडेने तिरस्कार करणाऱ्यांना सुनावलं, म्हणाली, "तुम्ही ज्याच्यावर…"

अभिनेत्री पूनम पांडे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. २ फेब्रुवारीला पूनम पांडेच्या निधनाची बातमी समोर आली होती यामुळे सिनेसृष्टीत सर्वांना धक्का बसला होता. पण ३ फेब्रुवारीला सकाळी पूनमने स्वतःच्या इन्स्टाग्रामवर जिवंत असल्याची घोषणा केली. त्या दिवसापासून पूनम पांडे चांगलीच ट्रोल झाली आहे. लोकांनी तिला खूप वाईट व चांगले असं म्हटलं. ट्रोल झाल्यानंतर पूनम पांडेने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन पोस्ट शेअर करत स्वतःची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. (Poonam Pandey Fake Death News)

पूनम पांडेचे म्हणणे आहे की, तिने गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाबाबत लोकांना जागरुकतेचा इशारा देण्यासाठी तिच्या मृत्यूची खोटी बातमी पसरवली होती. पण लोकांना ही पद्धत चुकीची वाटली म्हणून त्यांनी पूनम पांडेला ट्रोल केले. पूनम पांडे आता तिच्या बचावासाठी एकामागून एक पोस्ट करत आहे ज्यात तिने ‘मला मारा, मला सुळावर चढवा’ असं काहीसं लिहिलेलं पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – आमिर खानवर टीका केल्यानंतर पूर्वाश्रमीच्या पत्नीचा संताप, संदीप रेड्डी वंगा यांच्यावर भडकली अन्…; म्हणाली, “त्याच्या चित्रपटाबद्दल…”

गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाबाबत जनजागृती करण्यासाठी पूनम पांडेने तिच्या ‘मृत्यू’ची खोटी बातमी पसरवल्याबद्दल सगळीकडून अभिनेत्रीला टीकेला सामोरे जावे लागत आहे. पूनम पांडेने पुन्हा एकदा इन्स्टाग्रामवर पोस्ट करत लिहिले आहे की, “मला मारा, मला सुळावर चढवा, माझा तिरस्कार करा, पण तुम्ही ज्याच्यावर प्रेम करत आहात त्या व्यक्तीला वाचवा” असं तिने म्हटलं आहे.

आणखी वाचा – सुप्रसिध्द मराठी अभिनेत्रीने चाहत्यांना दिली गुडन्यूज, सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत म्हणाली…

पूनम पांडे यांच्या सहकार्याने एक मार्केटिंग एजन्सी ही मोहीम चालवत होती. त्यांनीदेखील या मोहिमेअंतर्गत माफी मागितली. या एजन्सीने माफी मागत म्हटलं की, “होय, आम्ही पूनम पांडेच्या गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाविषयी जनजागृती करण्याच्या उपक्रमात सहभागी होतो. आम्ही मनापासून माफी मागू इच्छितो”. पूनमच्या निधनाची बातमी ऐकताच सुरुवातीला सगळ्यांनाच दुःखद धक्का बसला होता. तर अनेकांनी ती जिवंत असल्याचे दावेही केले होते. पूनम जिवंत असल्याचं समोर आलं. तिने स्वतः इन्स्टाग्रामद्वारे व्हिडीओ शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग याबाबत जनजागृती करण्याच्या हेतून हा स्टंट केला असल्याचं तिच्या व्हिडीओमधून दिसून आलं.

Tags: entertainmentPoonam pandey deathpoonam pandey fake death newsPoonam Pandey Instagrampoonam pandey troll
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Jennifer Winget Wedding
Entertainment

घटस्फोटाच्या १२ वर्षांनी टीव्ही अभिनेत्रीची लगीनघाई, सिंगापूरच्या उद्योगपतीसह बांधणार लग्नगाठ

जून 8, 2026 | 2:02 pm
vivek dahiya divyanka tripathi kids
Entertainment

लग्नाच्या १० वर्षांनी जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर केली त्यांची पूजा, दोन्ही आजी-आजोबाही उपस्थित, बाळाची झलक

जून 8, 2026 | 12:00 pm
pepsi sharma passes away
Entertainment

हरियाणवी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार काळाच्या पडद्याआड, अचानक छातीत दुखू लागलं आणि…

जून 8, 2026 | 10:02 am
Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
Next Post
Bipasha Basu And Karan Singh Grover

लेकीच्या हृदयाला दोन छिद्र, जन्मताच सत्य कळालं अन्…; बिपाशा बासू व करणला झालं होतं दुःख अनावर, म्हणाला, "डॉक्टरांकडे तिला सोपावलं अन्…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.