Poonam Pandey Death : बॉलिवूड अभिनेत्री व मॉडेल पूनम पांडेच्या निधनानंतर सगळीकडे एकच खळबळ उडाली. शुक्रवारी (२ फेब्रुवारी) सकाळी तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक पोस्ट शेअर करण्यात आली. या पोस्टद्वारे कर्करोगामुळे तिचं निधन झालं असल्याचं सांगण्यात आली. पूनमच्या टीमनेच ही माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचवली. पण दोन दिवसांपूर्वी अगदी चांगल्या अवस्थेमध्ये पूनम एका कार्यक्रमाला उपस्थित होती. कर्करोगामुळे पूनमचं निधन कसं झालं? असे अनेक प्रश्न सध्या निर्माण होत आहेत. अशामध्येच पूनमच्या निधनाबाबत एक नवी माहिती समोर आली आहे. यामध्ये कर्करोगामुळे तिचं निधन झालं नसल्याचं सांगण्यात येत आहे.
पूनमच्या जवळच्या व्यक्तीने ‘झुम’शी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक मोठे खुलासे केले. पूनमचं निधन कर्करोगामुळे नव्हे तर ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे झालं असल्याची माहिती समोर आली आहे. पण तिने नक्की कोणत्या प्रकारची नशा केली होती हे अद्यापही समोर आलेलं नाही. पूनमबाबत सध्या संशय व्यक्त केले जात आहेत. दरम्यान तिच्या कुटुंबियांकडूनही कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे या प्रकरणाबाबत अनेक प्रश्न वाढत आहेत.
आणखी वाचा – पूनम पांडेला झालेला जीवघेणा आजार नेमका काय?, जाणून घ्या त्याची लक्षणे आणि उपचार
शिवाय काही रिपोर्ट्सनुसार, पुण्यामधील एका रुग्णालयामध्ये पूनमला दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयामध्येच तिने अखेरचा श्वास घेतला. पुण्यामध्ये निधन झाल्यानंतर उत्तरप्रदेशमध्ये तिचं पार्थिव नेण्यात आलं. पण या सगळ्या चर्चांमध्ये पूनमच्या कुटुंबियांनी मौन पाळणंच पसंत केलं आहे. पूनमबाबत कोणतीच माहिती अद्यापही तिच्या कुटुंबियांकडून आलेली नाही. त्यामुळे नक्की काय घडलं? याबबात फक्त संशय व्यक्त करण्यात येत आहे.
‘झुम’ने पूनचा बॉडीगार्ड अमिन खानबरोबरही संपर्क साधला. तेव्हा तो म्हणाला, “मला सध्या यावर कोणतंच भाष्य करायचं नाही. कारण मलाच धक्का बसला आहे. पूनमच्या युपीमधील घराला टाळा आहे. तिच्या कुटुंबियांनी मला कोणत्याच प्रकारची माहिती दिलेली नाही”. पूनमच्या टीमकडूनही कोणतीच नवी माहिती समोर आलेली नाही. आता पूनमच्याबाबतीत नेमकं काय घडलं?, तिचं निधन कशामुळे व कुठे झालं हे कधी उघड होईल याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.