शुक्रवार, एप्रिल 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Poonam Pandey Death : पूनम पांडेचा मृत्यू झालाच नाही, राहुल वैद्यचा मोठा दावा, नक्की खरं काय?

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
फेब्रुवारी 3, 2024 | 12:09 pm
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
Popular model and actress Poonam Pandey died at 32 News in Marathi

पूनम पांडे मृत्यू बातमी

Poonam Pandey Died at 32 : बॉलिवूड अभिनेत्री, मॉडेल पूनम पांडेच्या मृत्यूच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे. अभिनेत्रीने वयाच्या ३२व्या वर्षी जगाचा निरोप घेतला असून यावर कोणाचाही विश्वास बसत नाही आहे. पूनमच्या आकस्मिक मृत्यूची बातमी सर्वत्र पसरताच सर्वांनीच तिला श्रद्धांजली वाहिली आहे. अशातच असे काही सेलिब्रिटी आहेत जे या बातमीला खोटे ठरवत पूनम पांडेला काहीच झालं नसल्याचं बोलत आहेत. या यादीत गायक राहुल वैद्यचेही नाव जोडले गेले आहे.

पूनम पांडेच्या मृत्यूवर सध्या प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अभिनेत्रीच्या निधनाच्या माहितीशिवाय कोणतेही अपडेट समोर आलेली नाही. तसेच पूनमच्या कुटुंबीयांशी संपर्क साधता येत नाही आहे. पूनमचा मृत्यू कुठे व केव्हा झाला याबाबत कोणतीही माहिती नाही. तसेच तिचे अंतिम संस्कार कधी होणार याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. राहुल वैद्यने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये राहुलने असे लिहिले आहे की, “पूनम पांडेचा मृत्यू झालेला नाही असे वाटणारी मी एकमेव व्यक्ती आहे का?” असं म्हटलं आहे. या पोस्टवरुन राहुलला पूनमचे ​​निधन झाले यावर विश्वास बसत नसल्याचे समोर आलं आहे. इतर लोकांप्रमाणे राहुल देखील ही बातमी स्वीकारण्यास सक्षम नाही आहे.

आणखी वाचा – Poonam Pandey Death : बहिणीनेच दिली होती पूनम पांडेच्या मृत्यूची बातमी, आता संपूर्ण कुटुंबाचे फोन बंद, नेमकं सत्य काय?

केवळ राहुलच नाही तर पूनमचा मित्र व माजी लॉकअप स्पर्धक विनीत कक्करनेही ही बातमी खोटी असल्याचा दावा केला आहे. त्याने याबाबत एक निवेदन जारी करत असं म्हटलं आहे की, “मला वाटते की ही बातमी खोटी आहे. मी पूनमला ओळखतो, ती एक व खंबीर मुलगी आहे. मी तिच्याबरोबर लॉकअप शोमध्ये दोन आठवडे घालवले आहेत. त्यामुळे मला ती मुलगी म्हणून कशी आहे हे माहित आहे” असं त्याने म्हटलं आहे.

आणखी वाचा – “तिच्यावर धावून गेले अन्…”, बायकोला मारायचे रवींद्र महाजनी, गश्मीरचा मोठा खुलासा, म्हणाला, “पैसे गमावून…”

पूनमच्या मृत्यूची बातमी अनेकांनी खोटी असल्याचं म्हटलं आहे. लॉकअप शोच्या होस्टने पूनमच्या आकस्मिक निधनाबद्दल शोक व्यक्त केला. पूनमचे ​​इतक्या लहान वयात झालेले निधन धक्कादायक आहे, असे त्यांनी आपल्या या पोस्टमध्ये लिहिले आहे. याशिवाय पूजा भट्टनेही पोस्ट करून अभिनेत्रीला श्रद्धांजली वाहिली आहे.
पूजाने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “पूनम पांडेबद्दल ऐकून खूप वाईट वाटले. मी तिला कधीच भेटले नाही, पण जेव्हा आयुष्य एखाद्या तरुणावर आदळते तेव्हा ते नेहमीच विनाशकारी असते. माझ्या प्रार्थना तिच्या कुटुंबीय व मित्रपरिवारासह कायम आहेत. याशिवाय मुन्नवर फारुकी, अली गोनी, शिवम शर्मा, मंदाना करीमी, करणवीर बोहरा यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी पूनमच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

Tags: Cervical Cancerentertainmentpoonam pandeyPoonam Pandey Death ReasonPoonam Pandey Died at 32rahul vaidya
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
Poonam pandey death

अभिनेत्री-मॉडेल पूनम पांडे जिवंत, स्वतःच व्हिडीओ शेअर करत दिली माहिती, नेटकऱ्यांचा संताप अनावर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.