Poonam Pandey Died at 32 : बॉलीवूड इंडस्ट्रीतून आलेल्या एका बातमीने साऱ्यांनाच धक्का बसला आहे. वयाच्या ३२व्या वर्षी अभिनेत्री पूनम पांडे हिचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. पूनमच्या मृत्यूच्या बातमीने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर करण्यात आली होती, ज्यामध्ये पूनमचा मृत्यू गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाने झाल्याचे सांगण्यात आले होते. काही दिवसांपूर्वीच या अभिनेत्रीला शेवटच्या टप्प्यातील कर्करोगाची माहिती मिळाली. मात्र, पूनमच्या मृत्यूबाबत कुटुंबीय किंवा बहिणीकडून अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.
‘इंडिया टुडे’ने पूनम पांडेच्या जवळच्या व्यक्तीची चौकशी करण्याचा प्रयत्न केला. सूत्राने सांगितले की, सदर व्यक्तीला सकाळी पूनमच्या बहिणीचा फोन आला होता. पूनम आता या जगात नाही असे त्यांनी सांगितले होते. गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामुळे पूनमने या जगाचा निरोप घेतला आहे. यानंतर पूनम पांडेच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करण्यात आली होती, ज्यामध्ये तिच्या मृत्यूचा दावा करण्यात आला होता. तसेच चाहते व आप्तेष्टांना गोपनीयता राखण्याचे आवाहन करण्यात आले. यानंतर जेव्हा सूत्राने पूनम पांडेच्या बहिणीशी संवाद साधण्यासाठी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचा फोन नेटवर्क क्षेत्राच्या बाहेर येत असल्याचं सांगण्यात आलं.
सूत्राने पुढे असेही सांगितले की, “आम्ही सकाळी पूनम पांडेच्या बहिणीशी बोललो. त्यांनीच आम्हाला पूनमच्या मृत्यूची माहिती दिली. त्यानंतर आम्ही तिच्या बहिणीला फोन करण्याचा प्रयत्न केला असता तिचा फोन बंद असल्याचं समोर आलं. एवढेच नाही तर पूनमच्या कुटुंबातील इतर सदस्यही बेपत्ता आहेत व त्यांचे फोनही बंद आहेत. पूनमच्या टीममधील २-३ लोकांशी बोलण्याचा प्रयत्न केला असता सर्वांचे फोन बंद असल्याचं समोर आलं. फोन बंद असल्यामुळे नेमकं प्रकरण आहे तरी काय असा प्रश्न साऱ्यांना पडला आहे.
आणखी वाचा – लेक असावा तर असा! संतोष जुवेकरने आई-वडिलांसाठी घेतली नवीन कार, व्हिडीओ शेअर करत म्हणाला…
काही दिवसांपूर्वी पूनम पांडे पार्ट्यांमध्ये सहभागी होताना दिसली होती. चार दिवसांपूर्वी तिने एक पोस्ट शेअर केली होती, ज्यामध्ये ती एका इव्हेंटमध्ये जाताना दिसली होती. याशिवाय तिने एका इव्हेंटमध्ये पापाराझींना असेही सांगितले की, “ती फर्स्ट क्लास आहे आणि चांगले आयुष्य जगत आहे”. पूनमला अचानक गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर झाल्याचे तिने जगाचा निरोप घेतल्याचे समोर आले.