‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘पारू’ या मालिकेला प्रेक्षक भरभरुन प्रतिसाद देत आहेत. अल्पावधीतच ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. मालिकेच्या कथानकाच्या आणि कलाकारांनी या मालिकेला अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं. मालिकेचं कथानक हे गावाकडून आलेल्या पारू भोवती फिरणार दाखवण्यात आलं आहे. तर मालिकेतील अहिल्यादेवी या पात्राचा करारीपणा अधिक लक्ष वेधून घेत आहे. मालिका जसजशी पुढे सरकत जाते आहे तसतशी मालिकेच्या कथानकात बदल घडताना दिसत आहेत. (Paaru Serial Troll)
मात्र मालिकेत आलेले हे रंजक बदल प्रेक्षकांच्या पसंतीस पडलेले दिसत नाही आहेत. मालिकेत पारू व हरीश यांचं ऍडशूटसाठी लग्न होणार असतं मात्र अचानक एका मोठ्या प्रोब्लेममुळे हरीशच्या जागी आदित्य येतो. त्यावेळी पारू ते लग्न एन्जॉय करते. पारूला असं वाटत असतं की, तिचं हे लग्न खरं आहे. आदित्यला ती नवराही मानू लागते. आदित्यबरोबरच लग्न पारू खरं लग्न म्हणून स्वीकारते. आता पारूच हे वागणं नेटकऱ्यांना खटकू लागलं आहे. नेटकरी पारूच्या वागण्याला बालिश असं म्हणू लागले आहेत.

पारूचा नुकताच एक प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये पारू दिशापासून तिच्या गळ्यातील मंगळसूत्र लपवण्याचा प्रयत्न करत आहे. या प्रोमोखाली नेटकऱ्यांनी कमेंट करत मालिकेला आणि पारूला ट्रोल केलं आहे. नेटकऱ्यांनी कमेंट करत असं म्हटलं आहे की, “त्या बंगल्याच्या भाड्याचे पैसे जरा एखाद्या उत्तम लेखकावर खर्च केले असते तर अशी भंगार स्टोरी दाखवण्याची वेळ आली नसती. गावातून आली आहे म्हणून किती ते अडाणी दाखवायचं”. “पारुलाच आदित्यच्या गळ्यात आयत पडायचं म्हणून एवढं नाटक करत आहे. साखरपुडा एकाशी लग्न एकाशी. आणि हिचा साखरपुडा झाला तरी लग्नात खरं लग्न होत असल्यासारखी खुश होती”. “एवढी कशी ही अडाणी दाखवली आहे”.
तर आणखी काही नेटकऱ्यांनी कमेंट करत, “खरंच ही मालिका पाहून मला त्रास होत आहे. गावाकडून आहे म्हणून किती मूर्ख दाखवायचं एखाद्याला याची हद्द या मालिकेने ओलांडली”. “पारूचा फोटो कसा आला त्या विवाह संस्थावाल्या बाईकडे ते अहिल्या देवीला कळलं नाही का?,”. “पारूला आम्ही हुशार समजत होतो पण ही वेडी आहे”, अशा अनेक कमेंट करत ट्रोल केलं आहे.