Pooja Sawant Siddhesh Chavan Wedding : बऱ्याच दिवसांपासून अभिनेत्री पूजा सावंतचं लग्न चर्चेत होतं. अखेर काल दिनांक २८ फेब्रुवारी रोजी पूजा सावंत विवाहबंधनात अडकली. पूजा सावंतने तिचा बॉयफ्रेंड सिद्देश चव्हाणसह सातफेरे घेत लग्न केले. पूजा व सिद्धेशच्या शाही विवाहसोहळ्याची जोरदार चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. पूजाने सिद्धेशसह लग्नगाठ बांधत आयुष्याच्या नव्या प्रवासातील एक पाऊल पुढे टाकलं आहे. जवळचे नातेवाईक, कुटुंबीय व कलाकार मंडळींच्या उपस्थितीत पूजाचं अगदी थाटामाटात लग्न झालं असल्याचं समोर आलं आहे.
पूजाच्या विवाहसोहळ्यात अनेक व्हिडीओ व फोटो समोर आले आहेत. बॉलिवूड स्टाईलने अभिनेत्रीने उरकलेल्या या लग्नाला पारंपरिक टच देत तिने मराठमोळी परंपरा जपली असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. सावंतांची लेक ते चव्हाणांची सून इथरवरचा पूजाचा प्रवास संपन्न झाला आहे. पूजा तिच्या लग्नात खूप आंनदी असल्याचं पाहायला मिळालं. चेहऱ्यावर हसू व समाधान या दोन्ही गोष्टींनी अभिनेत्रींच्या नववधूच्या सौंदर्यात आणखीनंच भर पडली होती.
पूजाने सप्तपदी घेताना पिवळ्या रंगाची गुलाबी काठांची नऊवारी साडी नेसली होती, नाकात नथ, हिरवा चुडा व सोन्याच्या दागिन्यांनी तिचा लूक खूप खास दिसत होता. तर सिद्धेशने पांढऱ्या रंगाची शेरवानी या खास दिवसासाठी निवडली होती. तर रिसेप्शनसाठी पूजाने लाल रंगाची भरजरी साडी नेसली होती तर सिद्धेशने काळ्या रंगाची शेरवानी परिधान केली होती. पूजा व सिद्धेश दोघेही लग्नात खूपच सुंदर व आनंदी दिसत होते. पूजाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये या दोघांच्या शाही लग्नाची झलक पाहायला मिळाली.
सौभाग्यवती झाल्यानंतर पूजा खूपच खूश दिसत होती. दरम्यान उपस्थितांचे आभार मानत ती म्हणाली की, “माझं स्वप्न पूर्ण झालं आहे. सर्वप्रथम मी सगळ्यांचे आभार मानू इच्छिते की, वेळेत वेळ काढून, काम बाजूला ठेवून तुम्ही माझ्या या खास दिवसासाठी उपस्थिती लावली. मी खूप एन्जॉय केलं. आपण आपल्या लग्नाची, बायको होण्याची स्वप्न पाहत असतो, आणि आता लग्नाचे विधी सुरु होते तेव्हा मी एक-एक विधी एन्जॉय करत होते. माझ्या आयुष्यातील या अगदी अचूक माणसाच्या शोधासाठी मी इतकी वर्षे थांबले होते. सिद्धेश माझ्या आयुष्यात आलास त्याबद्दल तुझेही आभार”, असं ती म्हणाली.